Baramati News : गेले पंधरा दिवस सुरू असलेली झंझावाती प्रचाराच्या तोफा सोमवारी(ता.18) थंडावणार आहेत. ही विधानसभा निवडणूक सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई आहे.त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. यातच संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीतही (Baramati) यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.यात अजित पवारांसाठी मैदानात उतरलेल्या जय पवारांनी आपलीच पहिल्याच तुफानी भाषणाने बारामतीची सभा गाजवली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याआधीच बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) तोफ मिशन हायस्कूल मैदानात धडाडली.ते बोलण्याआधी त्यांचे सुपुत्र आणि गेले काही दिवस बारामती मतदारसंघ पिंजून काढलेल्या जय पवारांनीनी आपलं पहिलं वहिलं भाषण केलं. हे भाषण पाच मिनिटांचंच होतं.पण त्या भाषणाला बारामतीकरांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटासह साथ दिली.
जय पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अजितदादांसमोर आपलं हे पहिल्यांदाच भाषण करतोय,त्यामुळे घाबरलोय, काही चुकलं तर दादा माफ करा अशी साद घातली.लोकसभेची निवडणूक पार पाडली. विधानसभा निवडणूक जवळ आली. तेव्हा मी गावोगावी दौरे करत होतो. तेव्हा काही पदाधिकारी बोलले, आमच्याकडून किंवा गावाच्यावतीने लोकसभेवेळी चूक झाली. पण मी त्यांना सांगितलं, अजितदादा आणि वहिनींनी पार्थदादा आणि मला चांगले गुण शिकवले. त्यामुळे चूक कुणाचीच नाही झाली.सगळ्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत.सगळ्यांचे स्वतंत्र उच्चार असतात. ही लोकशाही आहे, असल्याचंही जय पवारांनी आपल्या भाषणात बोलून दाखवलं.
आणि त्यातल्या त्यात संपूर्ण बारामतीकर संपूर्ण पवार कुटुंबियांवर प्रेम करतात.त्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की, लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा.आज तुम्हांला दिसतंय, पहिल्यांदाच एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितलंय.आज आपल्याला दादांसारखे खंबीर नेते मिळाले आहेत.आजही ते सकाळी पाच वाजता उठतात आणि रात्री दोनपर्यंत काम करतात.असे एकच नेते आहेत ते आपले दादा आहेत.
लोकसभेवेळी पुढच्या लोकांकडून काही व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं, जाहिराती दाखवल्या.त्यात त्यांनी कुठेतरी दोन टँकर फिरवले आणि व्हाट्स अपवर शंभर टँकर फिरवल्याचे दाखवले. त्यांनी कुठतल्या गावात दोन लाईट लावले आणि व्हाटस् अपवर शंभर गावात लाईट लावल्याचं दाखवलं. तेव्हा मी दादांकडे गेलो आणि म्हणालो,दादा तुम्ही पस्तीस वर्ष विकासकामं केली,आम्हांलाही त्याच्या जाहिराती करूयात.
अजितदादांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. ते म्हणाले, जय, मी जी 35 वर्षांत विकासकामं केली, ती लोकांच्या ह्रदयात आहे. त्यांची जाहिराती करण्याची आपल्याला गरज नाही. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कारण दादांनाही तुमच्याशी बोलायचंय असंही ते म्हणाले.
तसेच जय पवारांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सर्व उपस्थितांना मोबाईलचे टॉर्च सुरु करायला सांगितले. त्यावेळी त्यांनी आपण अजित पवार बारामतीचे नंबर एकचे नेते आहेत की नाही असं विचारलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना आपण बारामतीचा लेक म्हणणार असल्याचं सांगितलं आणि तुम्ही अनुक्रमांक एक असं म्हणण्याचं आवाहन केलं.त्यांच्या विनंतीला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपच्या दिवशीची शेवटची सभा त्यांचं होमपीच समजल्या जाणाऱ्या बारामतीत पार पडली. अजित पवारांनी सकाळापासून विविध मतदारसंघात चार सभा घेतल्या. यासभेला बारामतीकरांची प्रचंड गर्दी दिसून आली. अजित पवारांनी या सभेतून बारामतीकरांना भावनिक साद घातल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.