Ajit Pawar Gopichand Padlkar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Vs Padalkar : सभा बँकेची, निषेध पडळकरांचा; अजितदादा म्हणाले, "नवे पायंडे..."

Chetan Zadpe

Pune News : बारामती सहकारी बँक सर्वसाधारण सभेमध्ये एका सभासदाने भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. त्यावर अजित पवारांनी त्या सभासदाला शांत राहण्याचा सल्ला दिला. बँकेच्या बैठकीत राजकीय चर्चा नको, अशी सूचना अजित पवारांनी केली. (Latest Marathi News)

भाजप आमदार पडळकर यांना अजित पवारांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रचंड आक्रमक झाला होता. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात होती. आज बारामती सहकारी बँक सर्वसाधारण सभेत एका सभासदाने पडळकरांचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. अजित पवारांनी या सभासदाला रोखले.

या वेळी अजित पवार म्हणाले, "ही बँकेची सर्वसाधारण सभा आहे. इथे कोणताही राजकीय ठराव करण्याच्या भानगडीत पडू नये. प्रत्येकाने बोलत असताना भान ठेवून बोललं पाहिजे, यात दुमत असायचं कारण नाही. प्रत्येक जण कुठल्यातरी पक्षाला मानत असतो. कुठल्यातरी नेत्याला मानत असतो. काहीतरी डोळ्यांसमोर ठेवून तो काम करत असतो. आपण काही नवीन पायंडे पाडायला नको, अशी माझी विनंती आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT