Bachchu Kadu On BJP : मुख्यमंत्री शिंदेंना हटवल्यास परिणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंचा भाजपला कडक इशारा

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग
Bachchu Kadu, Rahul Narwekar
Bachchu Kadu, Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. मूळ शिवसेनेतील फुटलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्र करावे, या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय होणार आहे. या निर्णयापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्लीवारी केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडूंनी भाजपला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील, असे कडूंनी सूचक वक्तव्य केले आहे. (Latest Political News)

शिवसेना फोडून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केले. दरम्यान, ठाकरे गटाने पक्षांतर बंदी कायद्यानुसार, १६ आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका दाखल केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर निर्णय घेतील, असे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर निर्णयास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले आहे. यानंतर राहुल नार्वेकर अॅक्शन मोडवर आले आहेत.

Bachchu Kadu, Rahul Narwekar
India Vs Canada : भारताचा कॅनडाला सज्जड दम; दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत 'या' मोठ्या करारावर चर्चा नाही

दरम्यान, पुरेशे संख्याबळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर शिवसेनेच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री शिंदे अपात्र झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

यावर बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) भाजपवर टीका करताना सूचक वक्तव्य केले आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यात काही टक्के मते आहेत. ते अपात्र ठरले तर भाजपला निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील. तसेच लोकसभेत भाजपचे असलेले प्लॅन यशस्वी होणार नाहीत,' असे कडूंनी स्पष्टच सांगितले आहे.

शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाची एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि दोन आठवड्यांनंतर काय कार्यवाही केली याबद्दल माहिती द्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Bachchu Kadu, Rahul Narwekar
Sarkarnama Podcast : छगन भुजबळांना गद्दारी भोवली ; बाळा नांदगावकरांनी दिवसा तारे दाखवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com