Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : पुणे ड्रग्ज, हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरणार; अधिवेशनापूर्वी आमदार धंगेकरांचा सूचक इशारा

Assembly session Ravindra Dhangekar warning Government : विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पब आणि अमली पदार्थांच्या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अनधिकृत पार वरती बुलडोजर फिरवण्याचे आदेश दिले.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (गुरुवार) सुरुवात होत आहे. या अधिवेशनामध्ये पुण्यातील पब संस्कृती अमली पदार्थांचा वाढलेला सुळसुळाट आणि कल्याणी नगर अपघात प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच याबाबत सूचक विधान केले आहे.

अधिवेशनापूर्वी पत्रकारांची संवाद साधताना रवींद्र धंगेकर म्हणाले, सध्या देशात राज्यात आणि पुण्यात पब, हुक्का बार आणि अमली पदार्थांचा विषय ऐरणीवर वर आहे. अमली पदार्थांच्या होणाऱ्या विक्रीमध्ये देशात पंजाब नंतर आता पुण्याचा नंबर लागत आहे. कोट्यावधी रुपयांचा अमली पदार्थ पुण्यामध्ये विक्री होत असताना पोलिसांना मात्र त्याचा सुगावा लागत नाही. एखादी क्लिप माध्यमांवरती व्हायरस झाल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे होत आहे आणि कारवाई करत आहे.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पब आणि अमली पदार्थांच्या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी या अनधिकृत पार वरती बुलडोजर फिरवण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात मात्र एखाद दोन ठिकाणी सोडली तर कुठेही बुलडोजर फिरलेला नाही.

पुण्यातील पोलीस प्रशासनामध्ये अत्यंत गलथान कारभार सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी घडलेल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणांमध्ये देखील दोन एफआयआर करण्यात आल्या. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे असताना देखील तपास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले. या प्रकारे पुण्यात पोलिसांचा मनमानी कारभार सुरू आहे.

पुणे हे विद्येचा माहेरघर आहे. सांस्कृतिक शहर आहे. या शहराला अनेक महापुरुषांचा वारसा लाभला आहे. मात्र या पुण्याला कलंक लावण्याचे काम पब संस्कृतीमुळे होत आहे. पुण्यामध्ये देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात मात्र ते पुण्यातून पब संस्कृतीचे शिक्षण घेऊन जाणार का? याबाबतची चिंता पालकांना लागली आहे त्यामुळे भविष्यात पालक पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला पाठवतील का? याबाबत शंका निर्माण झाली आहे याचा विचार सरकारने आणि पोलिस प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचं धंगेकर Ravindra Dhangekar म्हणाले.

पब संस्कृतीला पोलिसांचे अभय

पुण्यातील पब संस्कृतीला कुठेतरी पोलिसांचे अभय असल्यामुळेच ते फोफावत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी आता पुणेकरांनी रस्त्यावरती उतरून कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. पोलीस कुठेतरी यावरती नियंत्रण आणण्यात कमी पडत असून फक्त आमदारांनीच नाही तर सर्व पुणेकरांनी यामध्ये पुढे येऊन यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे धंगेकर म्हणाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT