Narendra Mehta : भाजपचा माजी आमदार आठवी पास तरीही 'पदवीधरला' मतदान? स्वतः दिले स्पष्टीकरण

BJP Narendra Mehta : नरेंद्र मेहता हे आठवी पास आहेत. त्यामुळे त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या फोटोमुळे आठवी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदान कसे केले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली जात आहे.
Narendra Mehta
Narendra Mehtasarkarnama

Narendra Mehta News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी (ता.26) पार पडली. यात दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. मिरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर आपल्या पत्नीसमवेत हाताच्या बोटाची शाई दाखवत एक फोटो पोस्ट केला होता. तसेच 2024 च्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपले मतदानाचे कर्तव्य पूर्ण करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावा! असे आवाहन केले होते.

नरेंद्र मेहता यांनी आमदारकीच्या निवडणूकीत सादर केलेल्या शपथपपत्रात आपले शिक्षण आठवी पास असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आठवी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदारसंघाच्य निवडणूकीत मतदान कसे केले? असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

नरेंद्र मेहता यांचे स्पष्टीकरण

नरेंद्र मेहता Narendra Mehta यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझ्या पत्नीने मतदानाचा हक्क बजावला. मात्र मी पक्षाच्या कामासाठी तेथेच असताना कार्यकर्त्यांनी माझे आणि माझ्या पत्नीचे एकत्र फोटो काढण्यासाठी उभे करत बोट दाखवण्यासाठी सांगितल्याने. मी कुठेही मतदान केल्याचे म्हटले नसल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

बोटावर शाई

नरेंद्र मेहता यांनी आपण मतदान vote केला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या बोटावर शाई दिसून येत आहे. ही शाई कुठली असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत केलेल्या मतदानाची शाई अजुनही बोटावर असल्याने ही लोकसभे वेळी केलेल्या मतदानाची शाई आहे का, असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे.

Narendra Mehta
Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्य सरकारची नजर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवर, विधानसभेपूर्वी हालचालींना वेग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com