Pune Police Sarkarnama
पुणे

Pune Police : पाय घसरून पडले, चर्चा मात्र आत्महत्येची; पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं ?

Sunil Balasaheb Dhumal

Pune News : पुण्यात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले नसल्याने आरोपींना जामीन मिळाला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित सहायक आयुक्तांची चांगलीच कानउघाडणी केली होती. यानंतर मानसिक तणावात आलेल्या सहायक आयुक्तांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलिस दलात आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून आपण घराच्या गॅलरीतून पडल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच सर्व घटनांबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अधिक माहितीनुसार, पुण्यातील मध्यभागात तीन महिन्यांपूर्वी टोळीयुद्धाचा प्रकारात एका तरुणाचा खून झाला होता. या गुन्ह्याचा तपास परिमंडळ एकमधील एका सहायक पोलिस आयुक्तांकडे सोपवला होता. त्यांनी या गुन्ह्यातील काही सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या साथीदारांवर न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी संबंधित सराईत गुन्हेगारांना जामीन मंजूर मिळाला. यामुळे सहायक आयुक्तांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झापले होते. (Latest Political News)

दरम्यान, संबंधित सहायक आयुक्त सोमवारी त्यांच्या घराच्या गॅलरीतून तोल जाऊन पडले. दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची माहिती रुग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलिस ठाण्याला दिली. ही माहिती पुणे पोलिस दलात वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चांना उधाण आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेची माहिती मिळाल्याच पुणे शहर पोलिस (Pune Police) दलातील वरिष्ठ अधिकारी, दोन पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त रुग्णालयात पोहोचले. त्यांनी उपचारासाठी दाखल झालेल्या सहायक आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी अधिकाऱ्याला धीर दिला. त्यानंतर सहायक आयुक्त गॅलरीत पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, अशी माहिती वरिष्ठांनी दिली.

दरम्यान, शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात वेळेत आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातून सराईतांना जामीनही मिळाला. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली होती. यातून सहायक आयुक्त मानसिक तणावखाली आले होते. त्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा शहर पोलिस दलात सुरू आहे. त्यावर पडदा टाकताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्त गॅलरीत पाय घसरून पडल्याचे सांगितल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT