Prataprao Chikhalikar : कहो दिल से...; 'डेंजर झोन'मधील चिखलीकरांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी ?

Nanded Loksabha Constituency : नांदेडमध्ये विरोधकांची पतंग काटण्यासाठी चिखलीकरांची तयारी सुरू...
Prataprao Chikhalikar
Prataprao ChikhalikarSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना उमेदवारीची खात्री असल्याने त्यांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपसाठी नांदेड लोकसभेची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा होती. चिखलीकरांच्याविरोधात मतदारसंघातील त्यांच्याच पक्षाचे आमदार नाराज असल्याचेही काही प्रसंगांमधून समोर आले. परंतु या सगळ्या घडामोडीनंतरही खासदार चिखलीकर हे पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळणार, याबाबत प्रचंड आशावादी आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रा आणि आता अयोध्या राम मंदिर निमंत्रणपत्रिका आणि अक्षतावाटपाच्यानिमित्ताने चिखलीकरांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नांदेडमध्ये लक्ष घालायला सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यांनी गेल्या महिन्यात दौरा करीत चिखलीकरांना बळ दिले होते. यापुढेही राज्यपातळीवरच्या नेत्यांचे नांदेड दौरे वाढणार आहेत. 'कहो दिल से चिखलीकर फिर से' असे स्टीकर्स शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीमही त्यांच्या समर्थकांनी हाती घेतली आहे.

Prataprao Chikhalikar
Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा पतंग उडणार? की कटणार...

गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून चिखलीकर जायंट किलर ठरले होते. दुसऱ्यांदा हा मतदारसंघ भाजपकडे राखण्यासाठी चिखलीकर (Pratap Chikhalikar) यांनी मतदारांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. नांदेड शहरातील विविध भागांत जाऊन श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पत्रिका व अक्षता वाटून नागरिकांशी संवाद साधत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून चार निवडणुकींचा अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत.

काँग्रेसच्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा 2019 मध्ये भाजपच्या चिखलीकरांनी पराभव केला होता. भाजपला मिशन 45 गाठताना नांदेडची जागा जिंकणे आवश्यक आहे. प्रत्येक राजकीय पक्षात गटबाजी असते तशी ती भाजपमध्येही दिसून येते. महायुतीच्या मेळाव्यात पक्षातील नेते, आजी-माजी आमदार उपस्थित होते. त्यामुळे एक चांगला संदेश मतदारसंघात गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या बळावर पुन्हा दिल्ली गाठायची, या निर्धाराने चिखलीकर कामाला लागल्याचे चित्र सध्या नांदेडमध्ये आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Prataprao Chikhalikar
Imtiaz Jaleel : एमआयएमच्या ओवैसींचा दावा, इम्तियाज जलील फिर से...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com