Rohit Pawar-Atul Bhatkhalkar Sarkarnama
पुणे

Bhatkhalkar Vs Rohit Pawar : ‘आजोबाजीवी नॉटी नातू…’ म्हणत भातखळकरांनी घेतला रोहित पवारांचा समाचार

Jalana Laticharge : जालना लाठीहल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. पण, ती पुरेशी नसल्याचे सांगत राजीनामा का नाही, अशी विचारणा आमदार रोहित पवार यांनी केली होती.

उत्तम कुटे

Pimpri News : मराठा आरक्षण आंदोलकांवर जालना जिल्ह्यात (आंतरवली सराटी, ता. अंबड) झालेल्या लाठीमारप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ४ सप्टेंबर) जाहीर माफी मागितली. पण, ती पुरेशी नसल्याचे सांगत राजीनामा का नाही, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नंदूरबार येथे केली होती. तिचा खरपूस समाचार भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज (ता. ५ सप्टेंबर) घेतला. (Atul Bhatkhalkar's criticism of Rohit Pawar)

मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यावेळी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी वटहुकूम का काढला नाही, असे सांगत मराठा आरक्षण ठाकरेंमुळे गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला हेाता. त्यावर वटहुकूम हा केंद्र सरकार काढते, असे उत्तर देत ठाकरेंनी फडणवीसांचे अज्ञान काढले होते. त्याचा समाचार घेताना फोटोग्राफीचीही पदवी नसलेल्यांनी कायद्याची पदवी असलेल्यांवर बोलू नये, असा टोला भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगावला होता.

आमदार रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. एकूणच भाजपचे दोन आक्रमक नेते सध्या ठाकरेवर त्यांनी इंडिया आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीचे यजमानपद घेतल्यापासून अधिक त्वेषाने तुटून पडल्याचे दिसत आहेत.

सरकारने माफी मागितली म्हणजे त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे. मात्र, संबंधित मंत्री (फडणवीस) अजूनही राजीनामा देत नसल्याने सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, असे रोहित पवार नंदूरबारमध्ये बोललो होते. त्याचा खरपूस समाचार भातखळकर यांनी घेतला.

‘जनाची नाही मनाची नाही, निदान नवाबाची तरी...’असे म्हणत देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या संबंधित मंडळींशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या आपल्याच पक्षाचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे राष्ट्रवादीचे आजोबाजीवी नॉटी नातू आज देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहेत, असा टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT