Kopargaon News : जो निवडणूक हरतो, त्याला अनेक सल्लागार असतात. ‘असं करा, तसं करा,’ असे सांगत असतात. मी म्हटलं तिसरा उमेदवार द्यायचा ना. घरी बसल्या बसल्या निवडून आले असते मी. तिसरा उमेदवार असता तर परळीत माझा पराभव अशक्यप्राय गोष्टी होती, अशा शब्दांत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी २०१९ मधील पराभवाचे शल्य पुन्हा बोलून दाखवले. (If there was a third candidate, my defeat in Parli would have been impossible : Pankaja Munde)
शिवशक्ती परिक्रमा करत असलेल्या पंकजा मुंडे आज (ता. ४ सप्टेंबर) नगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये होत्या. त्यावेळी झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल भाष्य केले.
माजी मंत्री मुंडे म्हणाल्या की, माझ्याकडे सल्लागार खूप आहेत. जो निवडणूक हरतो, त्याला अनेकजण सल्ले देत असतात. मी मात्र भारतीय जनता पक्षाला आणि युतीला २५ आमदार निवडून देण्यासाठी योगदान दिलं आहे. नुसता माझा व्हिडिओ आला तरी तुम्ही मतदान देता की नाही. मला एवढं भरभरून प्रेम दिलं आहे. तरीही काहींना वाटतं ताईचं काय. माझं काय, जे तुमचं ते माझं आणि माझं ते तुमचं, हे तर पक्कं आहे.
आपल्या वाट्याला यापुढे संघर्ष आला पाहिजे, असं मला वाटत नाही. संघर्ष आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी आपल्याला काम करायचे आहे, तसे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. तुमच्यासाठी श्वासात श्वास असेपर्यंत काम करत राहीन. कधीही तुम्हाला अंतर देणार नाही, असा शब्द पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पंकजा म्हणाल्या की, राजकारण हे व्रत आहे आणि राजकारणात काट्यावर चालणाऱ्यांचीच कदर होते. गाडीच्या आडावर चालणाऱ्यांची कदर हेात नसते. ज्याला सहज मिळतं, तो एखाद्या पदावर विराजमान होऊ शकतो. पण, ज्याला संघर्षाने मिळतं, तोच नेता हेाऊ शकतो. म्हणूनच संघर्ष आपल्याला रुबाबदार आणि स्वाभिमानी बनवतो. या स्वाभिमाने आणि रुबाबाने मी शिवशक्ती परिक्रमा करायला निघाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.