Atul Deshmukh Sarkarnama
पुणे

Pune BJP : भाजपला धक्का! अतुल देशमुखांचा राजीनामा; शिरुरमधील महायुतीचं गणित बिघडणार?

Shirur Lok Sabha Election 2024 : अतुल देशमुखांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : महायुतीत सहभागी मित्रपक्षांतील नेत्यांना कंटाळून भाजपच्या शिरूरमधील अतुल देशमुख या खंद्या शिलेदाराने सर्व पदांचा राजीनामा दिला. ऐन लोकसभेच्या तोंडावर देशमुखांनी दिलेला राजीनामा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांची धाकधूक वाढवणारी ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत 45 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलेल्या भाजपवर पक्ष फोडाफोडीचा डाव उलटण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. Atul Deshmukh Resign of BJP All Position.

शिरूर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे नेते अतुल देशमुख Atul Deshmukh यांनी भाजपला रामराम केला आहे. यावेळी त्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शिरूर लोकसभा निवडणुकीत यश मिळाले तर माझे आणि अपयश आले की अतुल देशमुखांचे, अशी भूमिका खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटीलांची आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीचा समन्वय झाला नाही. त्यातच दिलीप मोहितेपाटील Dilip Mohite Patil यांच्याशी असलेल्या संघर्षामध्ये काम करणे शक्य नाही. त्यामुळे राजीनामा देत आहे. पुढच्या काळात आम्हाला न्यायिक मार्ग मिळेल, त्या पक्षात प्रवेश करू, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

resign letter

अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपचे मोठे नेतृत्व होते. लोकसभेच्या महायुतीच्या जाहीर मेळाव्याला अतुल देशमुख गैरहजर होते. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत देशमुखांची व्यक्त केली. भाजपाने विकासाबाबत विश्वासात घेतले नाही, ताकद देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. शिवाजी आढळरावपाटीलांच्या Shivajirao Adhalrao उमेदवारीनंतर भाजपात नाराजी होती. आता कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी तातडीची बैठकांचा जोर लावला जात आहे. आता भाजपातून बाहेर पडलेले अतुल देशमुख काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशमुखांनी राजीनाम्यात काय म्हटले?

राज्य व देशात भाजपची सत्ता आहे. शिवाजी आढळराव पाटील व त्यांच्या कार्यकत्यांना निधी दिला. आमदार दिलीप मोहितेंनाही मोठ्या प्रमाणात निधी दिला. परंतु भाजपच्या माध्यमातून निवडूण आलेल्या ग्रामपंचायींना व नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांना निधीपासून वंचित ठेवले. कामासाठी वरिष्ठांना भेटल्यानंतर टाळले गेले. यावरुन खेड तालुक्यात वरिष्ठ नेत्यांना फक्त एका जिल्हा परिषद गटातच पक्ष वाढवायचा आहे. माझ्यासारख्या इतर कार्यकत्यांची नेत्यांना पक्षात गरज वाटत नाही. त्यामुळे प्राथमिक सदस्यत्वासह खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख, भाजप पदाचा राजीनामा देत आहे, असल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT