Parbhani Loksabha Constituency : जानकर-जाधवांचं अपक्षांनी वाढवलं टेन्शन, आज 'रात्रीस खेळ' चालणार!

Sanjay Jadhav and Mahadev Jankar : एकूण 41 अपक्ष परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Sanjay Jadhav and Mahadev Jankar
Sanjay Jadhav and Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : महायुतीने परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडली. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून ही जागा देऊ केली आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना बळ दिले आहे. जानकर यांच्या उमेदवारीने परभणी लोकसभा मतदारसंघात रंगत वाढली असली तरी काही अपक्षांमुळे जानकर आणि महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची डोकेदुखी वाढली आहे.

आता उपद्रव शक्ती असलेल्या अपक्षांना माघार घ्यायला लावण्यासाठी आज रात्रीस खेळ चालणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. महायुती असताना भाजपच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तर संजय जाधव(Sanjay Jadhav) यांच्या हक्काच्या वोट बॅंकेला धक्का पोहचू शकेल असेही काही अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. या सगळ्यांच्या माघारीसाठी आज रात्रभर आणि उद्या (ता. 8) सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत मनधरणीचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Jadhav and Mahadev Jankar
Dhananjay Munde News : पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे मैदानात; अमरसिंह पंडितांच्या बैठकीला उपस्थिती!

यात प्रामुख्याने महायुतीचे महादेव जानकर(Mahadev Jankar) यांना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुदगलकर, सखाराम बोबडे, विठ्ठलराव तळेकर, कॉ. गणपत भिसे, डॉ. गोवर्धन खंडागळे यांची उमेदवारी अडचणीची ठरणारी आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डख, मराठा आरक्षण समन्वय समितीचे सुभाष जावळे, बहुजन समाज पार्टीचे आलमगीर खान तसेच समीर दुधगावकर, स्वाभिमानी पक्षाचे किशोर ढगे यांची अडचण ठरू शकते.

एकूण 41 अपक्ष परभणी लोकसभा मतदारसंघातून मैदानात आहेत. यापैकी किती टिकतात आणि किती माघार घेतात हे उद्या दुपारी तीन नंतर स्पष्ट होणार आहे. भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे राजन क्षीरसागर, वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डख, बहुजन समाज पार्टीचे आलमगीर खान हे तीन, बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद आंभोरे, स्वाभिमानी पक्षाचे किशोर ढगे, ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लतचे शेख सलीम, स्वराज्य शक्ती सेनेच्या संगीता गिरी, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे कृष्णा पवार यांचा समावेश आहे.

Sanjay Jadhav and Mahadev Jankar
Beed Loksabha Election : OBC नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे तेव्हा कुठे होत्या? ; टी.पी.मुंडेंचा सवाल!

याशिवाय अनिल मुदगलकर, आप्पासाहेब कदम, गोविंद देशमुख, सखाराम बोबडे, मुस्तफा शेख, विजय ठोंबरे, विष्णूदास भोसले, कॉ. गणपत भिसे, शिवाजी कांबळे, विठ्ठल तळेकर, निहाल कौसडीकर, समीर दुधगावकर, अर्जून भिसे, अ‍ॅड. यशवंत कसबे, राजेंद्र अटकल, सय्यद इर्शाद, नारायण चव्हाण, राजाभाऊ काकडे, ज्ञानेश्‍वर दहिभाते, कैलास पवार, सुभाष जावळे, किशोरकुमार शिंदे, डॉ. गोवर्धन खंडागळे, बाबासाहेब उगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com