Narendra Modi Sarkarnama
पुणे

Lokmanya Tilak National Award : 'पुरस्कारातून मिळालेली रक्कम 'नमामि गंगे' योजनेला समर्पित' - नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्यूरो

PM Modi's Lokmanya Tilak Award: लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना उत्साह वाढल्याचे सांगून हा पुरस्कार १४० कोटी भारतीय यांना समर्पित करीत आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, 'लोकमान्य टिळकांच्या नावात गंगाधर हा शब्द असल्याकडे लक्ष वेधून, या पुरस्काराची रक्कम 'नमामी गंगे'या योजनेसाठी देण्याची घोषणाही मोदींनी केली.

'ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी 'नमामि गंगा' या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुणे आणि काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण दिले आहे, असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले.

पुरस्कारात मिळालेली रक्कम 'नमामि गंगे' योजनेला समर्पित - नरेंद्र मोदी

याप्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, 'महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. "लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत आहे." असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कारारने गौरविण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. दीपक टिळक हेही उपस्थित होते.

टिळक पुरस्काराने माझी जबाबादारी वाढली आहे.

नरेंद्र मोदींचे स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनतेशी संवाद साधत, कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे.

SCROLL FOR NEXT