PM Visit to Pune : पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी पावणेअकरा वाजता पुण्यात विमानातून उतरले. त्यावेळी, राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य काही मंडळी त्यांच्या स्वागतासाठी रांगेत उभे राहिली. मोदी उतरले, रेनकोट घातलेले दोन-चार सुरक्षारक्षक त्यांच्याभोवती दिसले; पण त्यांना थोडेसे बाजुला करून भलीमोठी छत्री स्वत: हातात घेऊन साऱ्यांचे स्वागत स्वीकारत राहिले.
या साऱ्यांत एक बाब सगळ्यात नजरेत भरली ! ती म्हणजे, एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने नमस्कार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो भन्नाट ‘लूक’ ...विशेष म्हणजे, मोदी स्वत:च छत्री घेऊन काही अंतर पुढे आले. तेव्हा ती घेण्यासाठी कोणी पुढे आला ना, ना मोदींनी छत्री कोणाकडे दिली. पुढच्या प्रवासाला म्हणजे, कृषी महाविद्यालयाकडे निघेपर्यंत मोदी छत्री काही सोडली नाही.
एरवी, पंतप्रधानांचा दौरा, त्यांच्याभोवतीच्या सुरक्षेचे कडे, त्यांच्या दिमतीची यंत्रणा....आणि पंतप्रधानाचा रुबाब दिसून येतो. या दौऱ्यांत छत्री खालचे मोदी खास आकर्षण ठरले. लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी मंगळवारी पुण्यात आले; ते सकाळी पावणेअकरा वाजता पुण्याच्या विमानतळावर पोचले. सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कायम होत्या.
मोदींच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य काही मंडळी हजर राहिली. प्रोटोकॉलनुसार ही मंडळी मोदींसाठी विमानतळावर पोचले होते. मोदींचा हा अनेक अर्थाने गाजत आहे. कृषी महाविद्यालयावरून मोदींच्या वाहनांचा ताफा थेट दगडूशेठ मंदिराकडे निघाला. तिथे अभिषेक करून मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी सर परशुराम महाविद्यालयात पोचले आहेत.