Murlidhar Mohol  Sarkarnama
पुणे

Bjp Pune Politics : कुपन भरा... अयोध्येला चला! निवडणुकीपूर्वी भाजपची मतांसाठी बेगमी

Ram Mandir Ayodhya Darshan Murlidhar Mohol Organaise Program In Pune : पुण्यात भाजपने अयोध्यादर्शनासाठी लढवली शक्कल...

Chaitanya Machale

Ram Mandir Ayodhya Pune News :

प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या मंदिरात होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा देशातील कोट्यवधी नागरिकांना अनुभवता यावा, यासाठी केंद्र सरकारने 22 जानेवारीला (सोमवारी) अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केलेली आहे.

काही राज्यांनी या दिवशी पूर्ण दिवस सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातदेखील 22 जानेवारीला संपूर्ण दिवस सुटी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होऊन पूर्ण दिवस सुटी मिळणार आहे.

शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम भव्य-दिव्य अशा मंदिरात विराजमान होणार असल्याने 22 जानेवारीला हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा. या दिवशी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन यापूर्वीच केंद्रीयपातळीवरील नेत्यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आलेले आहे. यामध्ये रामरक्षास्तोत्र पठण, दोन धागे श्रद्धेचे, गीत रामायण, कारसेवकांचा सत्कार, एक दिवा रामासाठी अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

माजी महापौर आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून एस. पी. कॉलेज येथे 'अपने अपने राम' या रामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध कवी, व्याख्याते डॉ. कुमार विश्वास हे रामकथा सांगणार आहेत. तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. यासाठी भव्य-दिव्य असा स्टेज तयार करण्यात आला आहे. दररोज ऐंशी हजार ते एक लाख नागरिकांना या रामकथेचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भविकांमधील दीडशे भाविकांना आणि त्यांच्यासोबतचा एक नातेवाईक अशा तीनशे नागरिकांना मोफत अयोध्यानगरीला जाण्याची संधी मिळणार आहे. यासाठी कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांकडून कुपन भरून घेतली जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या रामकथा कार्यक्रम प्रत्येक दिवशी जमा होणाऱ्या कुपनमधून 50 जणांचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. ज्या भाविकांचे नाव यामध्ये येईल, त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य एका व्यक्तीला मोफत अयोध्येला नेले जाणार आहे.

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ही मोफत अयोध्या सहल असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अनेक जण इच्छुक आहेत. त्यासाठी रामाचे नाव पुढे करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT