bachchu Kadu and cm meeting  Sarkarnama
पुणे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंच्या आंदोलनावर तोडगा निघणार; दत्ता भरणेंनी दिली महत्वाची माहिती

Bacchu Kadu protest Datta Bharane Statement: बच्चू कडू यांच्याशी अनेक मंत्र्यांशी संवाद सुरू आहे. आज त्याच अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडेल. बच्चू भाऊंच्या मागण्यांचा विचार सरकार नक्की करेल...

Sudesh Mitkar

Pune News: माजी आमदार आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शेतकरी आंदोलन सुरू असतानाच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना अतिवृष्टी आणि नुकसानीबाबत विचारले असता भरणे यांनी ही माहिती दिली. "गेली ६-७ महिन्यांपासून पाऊस पडतोय, एका दिवसांत वर्षभराचे पाऊस बरसतोय. अनेकांचे नुकसान झाले आहे. त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतील. शेतकऱ्यांनी धीर धरावा. हे सरकार आपल्या पाठीशी आहे.”

कर्जमाफी शक्य आहे का? आज शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल? या प्रश्नावर भरणे म्हणाले, “बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू आहे, पण त्यात आज महत्त्वाची बैठक पार पडेल. त्यात महत्त्वाचा निर्णय होईल. आम्ही सरकार म्हणून कर्तव्य पार पाडतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत. निश्चितपणे तोडगा काढतील.”

बच्चू कडू आंदोलन काल चिघळले होते. भविष्यातही आंदोलनाची शक्यता असल्याबाबत विचारले असता भरणे म्हणाले, “बच्चू कडू यांच्याशी अनेक मंत्र्यांशी संवाद सुरू आहे. आज त्याच अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडेल. बच्चू भाऊंच्या मागण्यांचा विचार सरकार नक्की करेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तोडगा काढतील.”

तोडगा निघाला नाही तर उद्यापासून पुन्हा आंदोलनाचा इशारा? असा प्रश्न विचारला असता भरणे म्हणाले, “आधी चर्चा तर होऊ द्या. चर्चेत योग्य तो निर्णय निघेल.”

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन उतरले याबाबत बोलताना भरणे म्हणाले, “आज मनोज जरांगे, उद्या महादेव जानकर, राजू शेट्टी असतील. हे आणि आम्ही सगळेच शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या माहीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत कशी मदत करता येईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.”

सदन शेतकरी आणि पेन्शनधारी शेतकऱ्यांना कर्जमाफितून वगळणार? असा प्रश्न विचारला असता भरणे म्हणाले, “सदनशील शेतकरी आणि पेन्शनधारी शेतकऱ्यांना कर्जमाफितून आपण नेहमीच वगळत आलोय. यावेळी तसाच काहीसा निर्णय घेतला जाईल.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT