Girish Bapat News : कसबा मतदार संघ हा भाजपचा बाल्लेकिल्ला मानला जातो. येथून भाजपचे गिरीश बापट पाचवेळा आमदार राहिले आहेत. त्यांचा या मतदरासंघात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्यानंतर येथून भाजपच्या मुक्ता टिळक आमदार झाल्या.
दरम्यान टिकळ यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक लागली. ही निवडणूक अजिबात चुरशीची नाही, असे म्हणत खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदार संघात भाजपचा कसा विजय होऊ शकतो, याचा कानमंत्रच दिला.
कसब्यासह चिंचवडची पोटनिवडणूक भाजपने (BJP) प्रतिष्ठेची बनविली आहे. कसब्यातून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर टिळक कुटुंबियासह ब्राम्हण समाजाने उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार रासने यांच्या प्रचारासाठी प्रकृती स्थिर नसतानाही खासदार गिरीश बापट (Girish Bapat) मैदानात उतरले. तेथे त्यांनी भाजपचा उमेदवार सहज जिंकेल. येथील विजयाचे पेढे भरवायला मीच येईल, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.
केसरीवाड्यात गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उमेदावर हेमंत रासने (Hemant Rasane), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), शैलेश टिळक, कुणाल टिळक आदी भाजपचे पदाधिकाऱ्यांसह बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, लोकजनशक्ती पार्टी आणि पतीत पावन संघटना याचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बापट यांनी कार्यकर्त्यांना चांगले काम करण्याचा सल्ला दिला.
गिरश बापट (Girish Bapat) म्हणाले, "भाजपने लढविलेल्या अनेक निवडणुकात पक्षाची हार-जीत झाली आहे. मात्र भाजपचे पक्ष संघटन कायम राहिले. या पक्ष संघटनेमुळे कसब्यातील ही निवडणूक चुरशची नाही. ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत", असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बापट म्हणाले, "कार्यकर्त्यांनी चांगलं काम करावे. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धान्य मानले आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे."
यानंतर त्यांनी हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या कामचे कौतूक केले. बापट म्हणाले, "हेमंतचे काम चांगले आहे. ते नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा, ही निडणूक आपणच जिंकणार आहोत. मी बरा होऊन परत येईल. विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.