Kasba News : कसबा मतदार संघ हा भाजपचा बाल्लेकिल्ला मानला जातो. येथून भाजपचे गिरीश बापट पाचवेळा आमदार राहिले आहेत. त्यानंतर येथून भाजपच्या मुक्ता टिळक आमदार झाल्या आहेत. दरम्यान टिकळ यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक लागली आहे.
ही निवडणूक आता भाजपने प्रतिष्ठेची बनविली आहे. येथील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी प्रकृती स्थिर नसतानाही आज खासदार गिरीष बापट अखेर मैदानात उतरले आहेत.
भाजपने त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस जणांचा स्टार प्रचारकांची फौज तयार केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसब्यात तळ ठोकून आहेत. असे असतानाही ब्राम्हण समाजाच्या नाराजीमुळे भाजपच्या गोठात धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमिवर पुण्याचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचारात सहभाग घेतला. गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली केसरीवाड्यात मेळावा पार पडला.
यावेळी हेमंत रासने (Hemant Rasane), मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), शैलेश टिळक, कुणाल टिळक आदी भाजपचे पदाधिकाऱ्यांसह बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, लोकजनशक्ती पार्टी आणि पतीत पावन संघटना याचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकृती गंभीर असतानाही बापट केसरीवाड्यातील सभेत उपस्थित राहिले होते. त्यांना बोलण्याचा त्रास होत आहे. त्यांना हालचाली करण्यातही मर्यादा आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारांना भावनीक साद, ब्राम्हण समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वताने करण्यात येत आहे.
कसबा मतदार संघातून गिरीश बापट पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. या पोटनिवडणुकीत त्यांचा संपर्क उपयोगात आणण्यासाठी भाजपची रणनिती दिसून येत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. आज त्यांनी थेट केसरीवाड्यातील मेळाव्यात हजेरी लावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.