Elon Musk On AI Farming .jpg Sarkarnama
पुणे

Elon Musk News : बारामतीतील 'त्या' प्रयोगाचं मोठं यश! सत्या नडेला यांच्यानंतर आता इलॉन मस्क यांनीही घेतली दखल

AI In Farming Project : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी या प्रोजेक्टची दखल घेतली होती. तसेच या अभिनव प्रयोगाची माहिती देणारी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता.

Deepak Kulkarni

Baramati News : बारामतीतील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं कृषीक्षेत्रात अभिनव प्रयोग राबवितानाच 'मायक्रोसॉफ्ट' या जगप्रसिध्द कंपनीच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर सुरू केला.या प्रयोगाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या जोरदारपणे चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर एका व्हिडिओमार्फत प्रसारित केली होती.यानंतर आता टेस्ला व स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनीही बारामतीतील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदलाचं प्रतीक असलेल्या'आर्टिफिशियल इंटेलिजेन्स'या प्रयोगावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिध्द उद्योगपती इलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर सत्या नडेला यांचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करत त्यावर आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सर्व काही बदलू शकते (AI WILL IMPROVE EVERYTHING) अशी कॅप्शन दिली आहे.थेट इलॉन मस्कने बारामतीतील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषीक्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या प्रयोगाची दखल घेतली आहे.

मायक्रोसॉफ्ट,ऑक्सफर्ड,बिल गेटस् फाऊंडेशन यांच्या मदतीने बारामतीस्थित अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टकडून कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स)वापर प्रभावीपणे सुरु केला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी या प्रोजेक्टची दखल घेतली होती. तसेच या अभिनव प्रयोगाची माहिती देणारी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यानंतर आता टेस्ला व स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा प्रसिध्द उद्योगपती इलॉन मस्क यांनीही याची स्वत:हून या उपक्रमाची दखल घेतली आहे.

बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या प्रयोगाच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य असल्याचं उसाच्या माध्यमातून सिध्द करुन दाखवलं आहे. याच उपक्रमाची दखल मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांनी दिल्ली येथे घेतली होती. यावेळी त्यांनी भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतक-यांसाठी वरदान ठरेल,अशी आशाही व्यक्त केली होती.त्यांनी स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवली होती.नडेला यांच्या माहितीचीच दखल इलॉन मस्क यांनी घेतली आहे.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार याबाबत माहिती देताना म्हणाले, इलॉन मस्क यांनी बारामतीतील या प्रकल्पाची दखल घेणे ही बाब या प्रकल्पाचे मोठे यश आहे.कृत्रिम बुध्दिमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झाला तर त्याचे सकारात्मक परिणाम जगभरातील कृषी क्षेत्रावर होतील,याची कल्पना इलॉन मस्क यांना असल्याने त्यांनी या प्रकल्पाची आपणहून दखल घेतल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच कृषिक्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या प्रकल्पाला जागतिक मान्यताही मिळू लागली आहे,हे याचे यश आहे. या प्रकल्पाचे महत्व हळुहळू सर्वांना समजू लागले आहे. पण प्रशिक्षण व संशोधनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं कायमच प्रोत्साहन मिळालं,त्यामुळेच हे शक्य झाल्याचंही पवार यांनी आवर्जून सांगितलं.

बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार याबाबत म्हणाले, इलॉन मस्क यांनी या प्रकल्पाची दखल घेणे ही निश्चितच आशादायक बाब आहे.आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे ही बाब उसाच्या माध्यमातून आमच्या संस्थेनं सिध्द केलं आहे. या यशामागं संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार,डॉ. अजित जावकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व त्यांच्या सर्वच सहका-यांचे अथक प्रयत्न असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT