Marathi Prime Minister : ‘तो’ पराभव झाला नसता तर 1996 मध्येच कोकणातील ‘हे’ नेते पहिले मराठी पंतप्रधान झाले असते; सुरेश प्रभूंनीही दिली कबुली

Madhu Dandavate : कर्नाटकतील जनता दलाचे दुसरे मोठे नेते रामकृष्ण हेगडे हेही पंतप्रधानपदासाठी इच्छूक होते. मात्र, ते पंतप्रधान होऊ नयेत, म्हणून देवेगौडा यांनी दंडवते यांना हसन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती.
Madhu Dandavate-Suresh Prabhu
Madhu Dandavate-Suresh PrabhuSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 February : देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होण्याचे आतापर्यंत तरी स्वप्नच राहिले आहे. काही नेते पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत गेले, मात्र ते त्या खुर्चीवर बसू शकले नाहीत. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशी काही मोजक्या नावांचा त्यामध्ये समावेश होतो. मात्र, जनता दलाचे मधु (नाना) दंडवते हे पहिले मराठी पंतप्रधान झाले असते. पण, राजापूर मतदारसंघातून शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांच्याकडून दंडवते यांचा पराभव झाला आणि एच. डी. देवेगौडा पंतप्रधान झाले. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात प्रभू यांनीही ती गोष्ट मान्य केली.

केंद्रातील 1996 मधील अटलबिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसांचं सरकार कोसळलं, तेव्हा एच. डी. देवेगौडा पंतप्रधान झाले. पण, जनता दलातील बहुतांश नेत्यांची इच्छा होती की, व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधान व्हावं. दुसरीकडे रामकृष्ण हेगडे यांनाही पंतप्रधान व्हावं, असं वाटत होतं. पण, जनता दलातील इतर नेत्यांचा त्यांना विरोध होता. व्ही. पी. सिंग यांनीच पंतप्रधान व्हावं, असं अनेकांना वाटत होतं. जर त्या निवडणुकीत मधु दंडवते निवडून आले असते, तर देशाचे पंतप्रधान देवेगौडा नव्हे; तर मधु दंडवते (Madhu Dandavate) झाले असते.

याबाबत नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात या गोष्टीला उजाळा मिळाला. सुरेश प्रभू (Suresh Prabhu) म्हणाले, मधु दंडवते हे लोकसभेच्या 1996 च्या निवडणुकीतील निकालाचे ट्रेंड बघत होते. त्या वेळी त्यांच्यासोबत बबन डिझुझा होते. ते म्हणाले, नाना बहुतेक आपलेच सरकार येणार. कारण, अटलबिहारी यांचे सरकार त्या वेळी राहणार नाही, असे सगळ्यांनाच माहिती होते. ते म्हणाले ‘तुम्ही...’. पण दंडवते म्हणाले, नाही, मी निवडणूक हरलो आहे.

Madhu Dandavate-Suresh Prabhu
Konkan Politic's : राजन साळवींना राजापुरातून आमदारकी, तर मला राज्यसभेची कमिटमेंट होती; किरण सामंतांचा गौप्यस्फोट (Video)

पण हे शंभर टक्के खरं आहे की, कदाचित देशातील पहिले मराठी पंतप्रधान हे मधु दंडवते झाले असते. पण, त्यामध्ये मी आडवा आलो. माझ्याकडून मोठी घोडचूक झाली. न विसरता येणारी गोष्टी माझ्याकडून ती झाली, अशी कबुलीही सुरेश प्रभू यांनी दिली.

दरम्यान, राजापूर मतदारसंघातून 1991मध्ये मधु दंडवते यांचा पराभव झाला होता. त्यामुळे 1996 च्या निवडणुकीत रिस्क नको म्हणून एच. डी. देवेगौडा यांनी दंडवते यांना कर्नाटकातील सुरक्षित हसन मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी विनंती केली होती. मात्र, त्यास मधु दंडवते यांनी नकार दिला होता.

Madhu Dandavate-Suresh Prabhu
Sachin Kalyanshetti : मुख्यमंत्री फडणवीसांनी विधीमंडळ समित्यांमध्ये सचिन कल्याणशेट्टींकडे दिली महत्वपूर्ण जबाबदारी!

कर्नाटकतील जनता दलाचे दुसरे मोठे नेते रामकृष्ण हेगडे हेही पंतप्रधानपदासाठी इच्छूक होते. मात्र, ते पंतप्रधान होऊ नयेत, म्हणून देवेगौडा यांनी दंडवते यांना हसन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. पण, दंडवते यांनी राजापूरमधूनच निवडणूक लढविण्यास पसंती दिली. मात्र, त्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्या पराभवामुळे एक मराठी माणूस पंतप्रधान होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com