Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: क्रीडा अकादमी, लॉजिस्टिक पार्क, कॅन्सर रुग्णालय..! अजितदादांच्या बारामतीसाठी मोठ्या घोषणा

Ajit Pawar NCP Election Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे उमेदवार असलेल्या सर्व मतदारसंघात स्वतंत्र जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.

Rajanand More

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी राज्यात एकाचवेळी अनेक मतदारसंघात करण्यात आले. त्यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघातील उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार मैदानात आहेत. अजित पवारांनी गावांगावात जाऊन प्रचार सुरू केला आहे. बुधवारी त्यांनी बारामतीसाठी स्वतंत्र जाहीरनामाही प्रसिध्द केला.

अजित पवार म्हणाले, गेल्या 30-35 वर्षात बारामतीत झालेला बदल पाहून आनंद होतो. मी केलेली विकासकामे सर्वत्र दिसतात. मागील पाच वर्षात नऊ हजार कोटींची विकासकामे केली आहेत. इतर कोणत्याही मतदारसंघात एवढी विकासकामे झाली नाही. मागील ३३ वर्षापासून माझे एकमेव ध्येय म्हणजे, प्रगतीचा नवीन आलेख गाठणे.

बारामतीला देशातील सर्वात आदर्श आणि प्रगत तालुका बनविण्यासाठी मी कटिबध्द आहे. राज्यात कुस्तीपटूंना आवश्यक सुविधा पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप चांगले यश मिळालेले नाही. म्हणून बारामतीत पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारणार आहे. कुस्ती, जलतरण, बॉक्सिंग आदी खेळांच्यासाठी सुविधा असतील.

शेतकऱ्यांसाठी कृषी आधारीत एमएसएमई नेटवर्क, अन्नप्रक्रिया उद्योग स्थापन करणार आहतो. लॉजिस्टिक पार्कची उभारणी करणार येईल. यामध्ये कुरिअर सर्व्हिस, कॉल सेंटर, वाहतुकीसाठी स्वतंत्र केंद्र आदींचा त्यामध्ये समावेश असेल. स्थानिक रोजगारांना संधी निर्माण होईल.

बारामतीला भारतातील पहिले सौर ऊर्जा शहर बनविण्याचा मानस आहे. बारामतीत अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणाही अजित पवारांनी केली. हे आमच्या बारामतीसाठी व्हिजन असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

अजित पवारांच्या बारामतीसाठीच्या घोषणा -

- अन्नप्रक्रिया उद्योग

- कर्करोग रुग्णालय

- देशातील पहिले सौर ऊर्जा शहर बनविणार

- लॉजिस्टिक पार्कची उभारणी

- जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT