Sharad Pawar : अजितदादांची साथ सोडलेले नरेंद्र राणे तुतारी फुंकणार; शरद पवारांची मुंबईतील ताकद वाढणार

Narendra Rane Join Sharad Pawar NC नरेंद्र राणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची साथ सोडली आहे. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्य रणधुणाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडणार नरेंद्र राणे तुतारी फुंकणार आहेत. ते बुधवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवारांची मुंबईतील ताकद वाढली आहे.   

नरेंद्र राणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी विलास माने, दिनकर तावडे आणि विजय देसाई हेही होते. आज चौघेही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

Ajit Pawar, Sharad Pawar
Eknath Shinde : महाराष्ट्र पिंजून काढत एकनाथ शिंदे प्रचारसभांचा रेकॉर्ड मोडणार; 12 दिवसांचा प्लॅन ठरला

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर होताच अनेकांनी बंडखोरी करत पक्ष बदलले आहेत. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अनेक नेत्यांनी इतर पक्षांत प्रवेश करत उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही त्याचा फटका बसला आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Maharashtra BJP: भाजपची मोठी कारवाई 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आघाडीतील पक्षांकडे इतर पक्षांतील नेत्यांचा ओघ वाढला होता. प्रामुख्याने शरद पवारांच्या पक्षामध्ये अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, आमदार राजेंद्र शिंगणे यांच्यासह इतर नेत्यांनी शरद पवारांची साथ दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com