Ajit Pawar-Sharad Pawar-Yugendra Pawar Sarkarnama
पुणे

Yugendra Pawar : निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत असतातच, बारामतीकर नक्कीच पवार साहेबांना साथ देतील!

Baramati Assembly Election 2024 : "राजकीय कुटुंबात असल्यामुळे आरोप प्रत्यारोप मला नवीन नाहीत. निवडणुका म्हटलं की हे होत असते. बारामतीकर आम्हाला विसरणार नाहीत. ते आम्हाला देखील आशीर्वाद देतील,"

Mangesh Mahale

Pune News: बारामती विधानसभा मतदारसंघात दोन पवारांमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार हे मैदानात आहे. कन्हेरी येथील निवासस्थानी मतदानाला जाण्यापूर्वी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"राजकीय कुटुंबात असल्यामुळे आरोप प्रत्यारोप मला नवीन नाहीत. निवडणुका म्हटलं की हे होत असते. बारामतीकर आम्हाला विसरणार नाहीत. ते नक्कीच पवार साहेबांना साथ देतील.आम्हाला देखील आशीर्वाद देतील," अशा शब्दात बारामती विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कथेत ऑडिओ क्लिप प्रकरणात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत प्रतिक्रिया देतील. निवडणुकीमध्ये राजकारण कोणत्या पातळीवर चालले आहे. हे आपण पाहत आहोत. शरयू टोयोटा या शोरूम मध्ये झालेल्या तपासणीमध्ये त्या ठिकाणी काही सापडले नाही. आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये देखील बारामती ॲग्रो च्या कर्मचाऱ्यांनी पैसे वाटलेचे आरोप भाजपने केले आहेत, याबाबतचे कथित व्हिडिओ समोर आले आहेत.

याबाबत "सगळेच व्हिडिओ खरे असतात असे नाही," असे युगेंद्र म्हणाले. माझे व माझ्या आजीचे नाते मला माहिती आहे. त्यामध्ये दुसऱ्यांनी यायची गरज नाही. सांगता सभेमध्ये त्यांचे पत्र दाखवणे हा तो त्यांचा प्रश्न होता. हे पत्र आजींनी लिहिलेले आहे का हे त्यांनाच विचारावे लागेल. परंतु आज मी आजींना भेटणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही तर त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे विचारपूस करण्यासाठी मी जाणार आहे, असे यावेळी युगेंद्र पवार म्हणाले. त्यांनी मतदानापूर्वी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई यांचा आशीर्वाद घेतला.

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला."महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद चार वेळा देऊनही अजित पवारांवर अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे," अशा शब्दात शरद पवार यांनी अजितदादांची कानउघाडणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT