Sanjay Raut : भाजपचा खेळ खल्लास! तावडेंच्या बॅगेत 5 कोटी? निवडणूक आयोग इकडे शेपूट घालतो...

Distribution of money from BJP national leader Vinod Tawde in Virar: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन क्षितिज ठाकुर यांचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
Distribution of money from BJP national leader Vinod Tawde in Virar:
Distribution of money from BJP national leader Vinod Tawde in Virar:Sarkarnama
Published on
Updated on

लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या मतदानाच्या दिवसाला काही तास शिल्लक असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकुर यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन क्षितिज ठाकुर यांचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. "भाजपचा खेळ खल्लास" असे सांगत "जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो," अशा शब्दात निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Distribution of money from BJP national leader Vinod Tawde in Virar:
Kolhapur Politics: पाटलांची भावनिक साद की नरकेंचा विकास; करवीरच्या जनतेला काय भावणार?

तावडे यांनी मतदारांना पैसे वाटपाच्या 5 कोटी रुपये आणले आहे, या आरोपावरुन बाविआ आणि भाजपमध्ये नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तुफान राडा झाला आहे. भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर हे एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. यावर कॅप्शन देताना संजय राऊतांनी भाजपचा खेळ खल्लास! असे म्हटले आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर. त्यांनी तावडेंना कोंडून ठेवलं. यावर भाजप काय खुलासा करणार आहे, असे राऊत म्हणाले.

Distribution of money from BJP national leader Vinod Tawde in Virar:
Ramesh Kadam : बाबा सिद्दीकींप्रमाणे माझ्या हत्येचा डाव ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची पोलीस ठाण्यात धाव, VIDIO पाहा

"विनोद तावडेंनी मला 25 फोन केले, मला माफ करा.. मला जाऊद्या… मला माफ करा…" असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगानं तावडेंवर कारवाई करावी. सगळ्यांना जाऊन देऊ. राष्ट्रीय नेता पैसे वाटपासाठी आले होते का? विनोद तावडे 5 कोटी रूपये घेऊन येणार, याची माहिती मला अगोदरच मिळाली होती. हे पैसे वाटप रात्रीपासून सुरू आहे,” असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com