Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Vs BJP : भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासण्याच्या तयारीत, युतीमध्येही वादाची ठिणगी?

Mahavikas Aghadi Mahayuti Politics Baramati NCP BJP : एकीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये कटूता निर्माण होत असतानाच दुसरीकडे देखील महायुतीमध्ये देखील मिठाच्या खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मधील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध राहील का? याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहेत.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीतील मित्र पक्षांमध्ये काहीशी कटूता निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये कटूता निर्माण होत असतानाच दुसरीकडे देखील महायुतीमध्ये देखील मिठाच्या खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामती मधील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारींनी थेट अजित पवार यांच्या पोस्टरला काळं फासण्याचा इशारा दिला आहे. बारामतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 15 ते 19 जानेवारी दरम्यान पार पडणार आहेत. बारामतीमध्ये होणाऱ्या या स्पर्धांसाठी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाने जोरदार तयार केली आहे.

शहरभर या स्पर्धेची माहिती देणारे पोस्टर देखील लावले आहेत. आणि हे पोस्टरच भाजप आणि राष्ट्रवादी मधील वादाचा मुद्दा ठरला आहे. या पोस्टरमध्ये अजित पवार यांचा मोठा फोटो वापरण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाणीवपूर्वक छोटा फोटो वापरण्यात आलाच आरोप भाजप युवा मोर्चा कडून करण्यात आला आहे.

यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जाणीवपूर्वक छोटा वापरला असून हे पोस्टर तातडीने बदलण्यास आले नाही तर या पोस्टरवरील क्रीडा मंत्र्यांच्या फोटोला काळं फासणार असल्याचा इशारा  सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा वैभव सोलणकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT