Pune Traffic News : पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी! पुणे शहर वाहतूक कोंडीत जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर

Traffic problems in Pune : गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. वाढत्या शहरीपणा बरोबर लोकसंख्याही झपाट्याने वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील वाढली आहे.
Pune Traffic
Pune TrafficSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही वर्षांत पुण्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पुणे हे देशासह जगातील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी अनेक बिरुद्ध मिरवणाऱ्या पुण्याला (Pune) जागतिक पातळीवर आणखी एक नवी ओळख मिळाली आहे. मात्र, ही ओळख तितकी कौतुकास्पद नाही.

जगभरातील वाहतूक कोंडी (Traffic) विषयी 'टॉम-टॉम' या डॅनिश संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवाल नुसार जागतिक वाहतूककोंडीत पुण्याचा चौथा क्रमांक लागला आहे. यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तो कोलंबियातील बरानकिला या शहराने. तर दुसऱ्या क्रमांकावर आपल्या देशातील कोलकाता हे शहर आहे आणि त्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू शहर आहे.

जगातील विविध देशांमधील बड्या शहरांमधील वाहतूक कोंडीचे सर्व्हेक्षण अहवाल तयार करण्याचे काम 'टॉम टॉम' ही डच कंपनी करते. २०२४ मध्ये या संस्थेने जगभरातील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या जगभरातील शहरांचे सर्वेक्षण केलं असून तो सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये शहरांच नाव, आणि संबंधित शहरामध्ये १० किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणार वेळ याचे सर्वेक्षण केलं आहे.

Pune Traffic
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का! मुंबईतील 'या' नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

या सर्वेक्षणानुसार पुणे शहरात 10 किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी 33 मिनिटं 22 सेकंद इतका वेळ लागत असल्याचे निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे. तर बरानकिला (कोलंबिया) या शहरात हा कालावधी 36 मिनिटं 6 सेकंद आहे. कोलकातामध्ये 34 मिनिटं 33 सेकंद तर बेंगळुरू: 34 मिनिटं 10 सेकंद इतका वेळ दहा किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी लागत आहे.

गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. वाढत्या शहरीपणा बरोबर लोकसंख्याही झपाट्याने वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. वाढली असली तरी शहरातील मध्यवर्ती भागामध्ये रस्त्याचे रुंदीकरण याला काही मर्यादा आहेत.

त्यामुळे वाढत्या वाहण्याच्या संख्येचा ताण या रस्त्यांवर पडताना दिसत आहे. याचमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असून यावरती योग्य उपाययोजना न केल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com