Baramati Businessman Rana Dilip Suryawanshi Sarkarnama
पुणे

Baramati Crime: बारामतीतून हादरवणारी अपडेट; उद्योजक राणा सूर्यवंशींचा स्वत:वरच हल्ला...,'व्हीआयपी' पोलिस संरक्षणाची हौस पडली महागात

Baramati Rana Suryavanshi Attack : बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणानं शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि उद्योजक असलेल्या सूर्यवंशी यांच्यावर 18 ऑक्टोबर 2026 च्या सायंकाळी बारामती विमानतळ परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता.

Deepak Kulkarni

Pune News: बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणानं शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि उद्योजक असलेल्या सूर्यवंशी यांच्यावर 18 ऑक्टोबर 2026 च्या सायंकाळी बारामती विमानतळ परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता.

बारामतीतील या घटनेमुळे कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी जलदगतीनं तपासाची सूत्रे फिरवली होती. अखेर याप्रकरणी पुणे पोलिसांनी शुक्रवारी (ता.23) तिसऱ्या आरोपीला अटक केली. त्यानंतर हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या समोर हादरवणारं सत्य आलं.

पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. सूर्यवंशी यांना मंत्री किंवा व्हिआयपी व्यक्तींना ज्याप्रकारे पोलिस सुरक्षा व्यवस्था दिली जाते, त्याचप्रमाणे 'एस्कॉर्ट' गाड्यांसह हाय-प्रोफाइल सुरक्षा मिळवण्याच्या हौसेपोटी व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरच जीवघेणा हल्ल्याचा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.

पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती तालुक्यात असलेल्या गोजुबावीमधील राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणी शुक्रवारी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. यानंतर या प्राणघातक हल्ला प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला आहे.

पोलिसांच्या तपासात उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी याआधी पैसे भरून पोलीस संरक्षण मिळवले होते. परंतू,त्यांना फक्त पोलिसांची सुरक्षा नको होती, तर थेट एखाद्या मंत्र्‍यांना जसा वाहनांचा ताफा आणि 'एस्कॉर्ट' गाड्यांसह व्हीआयपी दर्जाचं पोलीस संरक्षण हवं दिलं जातं.त्याचप्रमाणे सुरक्षायंत्रणा हवी होती असं समोर आलं आहे.

मात्र, एखाद्या व्यक्तीला हायप्रोफाईल सुरक्षा पुरवण्यासाठी संबंधिताच्या जीवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेतला जातो. त्यानंतरच वाहनांचा ताफा आणि 'एस्कॉर्ट' गाड्यांसह व्हीआयपी दर्जाचं पोलीस संरक्षण दिलं जातं. यामुळेच उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं दाखवण्यासाठी स्वतःवरच हल्ल्याचा कट रचला,अशी धक्कादायक माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

काय आहे प्रकरण..?

उद्योजक राणा सूर्यवंशी हे आपल्या खासगी कामानिमित्त बारामती येथे आले होते. यावेळी त्यांच्यासुरक्षेसाठी त्यांचे वैयक्तिक सुरक्षारक्षकी तिथे उपस्थित होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी 'आम्ही तुमचे फॅन आहोत' असं सांगत त्यांना बुके देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्रानं सूर्यवंशी यांच्या उजव्या हातावर वार केले. जखमी अवस्थेत त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT