Pune News, 12 Apr : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज प्रचाराला सुरुवात केली.
यानिमित्ताने बारामतीत आयोजित सभेत मंत्री अदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत भावूक भाषण केले. त्यांनी दादांच्या अपूर्ण स्वप्नांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. सभेत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, “२४ फेब्रुवारीला दादांची जिल्हा परिषद निवडणुकीत इथे शेवटची सभा झाली होती.
दादा निवडणुकीला सामोरे जायचे तेव्हा इथे मारुतीरायाच्या दर्शन घ्यायचे. दादा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर या भूमीत स्वप्न पाहिले आणि ती सत्यात उतरवली. दादांनी अनेक कार्यकर्ते तयार केले, आमच्यासारखे अनेकजण तयार केले. दादा एक व्यक्ती नव्हते, तर विचार होते. सगळ्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती होते.”
या मतदारसंघात दादांनी अनेक स्वप्न पाहिली. आषाढी एकादशीला आपण वारीला जातो तशी कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी विकासाची पंढरी बारामती आहे. निवडणूक दरम्यान अजितदादा अर्ज दाखल करताना आणि समारोप सभा बारामतीमध्ये घ्यायचे . अजितदादा कधीही बारामती प्रचार थांबत नव्हते.
अदिती तटकरे भाषणा दरम्यान भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “दादानंतर सगळं बाजूला ठेवून सुनेत्रा वाहिनी उभ्या राहिल्या, हे बारामतीकर कधीही विसरणार नाही. आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं दादांनी मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा आणि स्वप्न होतं. अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला नाही हे दुर्दैव आहे.
दादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले, त्या खुर्ची दादांना आम्ही पाहत आलो आहोत. भविष्यात सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या. प्रचंड मताने दादांच्या लाडक्या बहिणी सुनेत्रा पवार यांना निवडून आणतील. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती, पण तरीही बारामतीकर प्रचंड मताधिक्याने सुनेत्रा पवार यांना विजयी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.