

Ahilyanagar BJP news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी भाजपचे सुजय विखे पाटलांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. यावर विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
विखे पाटील सुरवातीला खूप गंभीर चेहऱ्यानं प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्ते, विखे पाटील सिरीयस आहेत, असे वाटून काहीसे शांत होते. विखे पाटील यांनी पुढे अचानक बोलण्याचा टोन बदलला अन् गंभीर वातावरणात एकदम हास्यकल्लोळाचा फवारे सुरू झआले. विखे पाटील यांनी मात्र शेवटी सूचक इशारा दिला.
भाजपचे (BJP) सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सुरवातील खूपच गंभीर चेहरा ठेवला होता. ते म्हणत होते, याचं दुःख मला आहे, मी त्या दुःखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय, या प्रचाराच्या माध्यमातून मी या दुःखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी फार मोठा अपघात झाला माझ्याबरोबर झाला.
माझ्या आई-वडिलांनी माझं निश्चित सांत्वन केलं. मला धीर देण्याचा प्रयत्न केला. बायकोने देखील धीर दिला. याचिका फेटाळली गेली, काळजी करू नको, म्हणत असतानाच, विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी एकदम हास्य सुरू केला. विखे पाटलांचे हास्य पाहून, याचवेळी त्यांच्याबरोबर आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही हास्यकल्लोळ सुरू झाला.
सुजय विखे पाटील यांनी पुढे, अरे कसलं काय, काय आपण चर्चा करतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, तुम्हाला पुढे गनिमी कावा झालेला दिसेल, असा सूचक इशारा देत निघून गेले. विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, एकाचवेळी दाखवलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची चर्चा मात्र कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत, सुजय विखे पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. मतमोजणीच्या दिवशीच त्यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला. त्याचे शुल्क देखील भरले. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेत फक्त नीलेश लंकेंना प्रतिवादी करण्यात आले. तसं पाहिल्यास अशा याचिकांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना देखील प्रतिवादी केले जाते. न्यायालयाने ही याचिका फेटाळताना काही गंभीर निरीक्षण नोंदवली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.