Baramati News: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि बारामती जिल्ह्यातील पुणे या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार या पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे. याचदरम्यान, बारामती पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार आणि राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. आता बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन जणांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले. पण या तीनपैकी एकही अर्ज बारामतीतून दाखल झालेला नाही. हे तीनही अर्ज बारामती बाहेरच्या इच्छुक उमेदवारांनी दाखल केले आहेत.
यात जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी, सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाकडून अर्ज दाखल केले आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दर्शवली आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीने दावा केला नाही, तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार आहे. त्याच भूमिकेला जिल्हा काँग्रेसने बैठकीत पाठिंबा दिला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिला होता, याची आठवण करून देत जिल्हा कमिटीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून बारामतीची जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक हे माध्यम असून बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवायची की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याचे सांगितले. यामुळे निवडणूक बिनविरोध होईल का नाही याबद्दल संभ्रम दिसून येतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.