Baramati By Election: बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक; काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट

Congress Baramati By Election News: आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह आता काँग्रेसनेही ओबीसींचे बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यामुळे आता बारामतीच्या पोटनिवडणूक लढच चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Sunetra Pawar Ajit Pawar  (1).jpg
Sunetra Pawar Ajit Pawar (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक होणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचं समोर येत आहे.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी(ता.23) पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही जागा लढवणार नसेल, तर वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिली.

काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते,

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीने दावा केला नाही तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार आहे. त्याच भूमिकेला जिल्हा काँग्रेसने बैठकीत पाठिंबा दिला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिला होता, याची आठवण करून देत जिल्हा कमिटीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून बारामतीची जागा लढवण्याची तयारी दर्शवली.

Sunetra Pawar Ajit Pawar  (1).jpg
Aaditya Thackeray News: राज्यात खळबळ उडवून दिलेल्या खरात प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; थेट वार तोही एकनाथ शिंदेंवरच,केली मोठी मागणी

यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीस ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी, कमलाकर सातव, गोविंद मिरघे, आकाश मोरे, रोहित बनकर, डॉ. विजय भिसे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण म्हणाले, पक्षश्रेष्ठींचे आदेश मिळाल्यास बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी सज्ज आहे. आमची तयारी आणि प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात येत आहे.

आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता दिसून येत आहे. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह आता काँग्रेसनेही ओबीसींचे बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यामुळे आता बारामतीच्या पोटनिवडणूक लढच चुरशीची होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेताना त्यांच्या पक्षाकडून येथे विरोधात उमेदवार देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघा़डीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे.

पण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधलेला बारामती मतदारसंघ, त्यांची विकासकामं, दांडगा जनसंपर्क, त्यांच्यामागे उभा राहणारा मतदार, कार्यतत्परता आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे नागरिकांमध्ये त्यांची अफाट लोकप्रियता होती. यामुळे अजित पवार निधनानंतरच्या सहानुभूतीमुळे सुनेत्रा पवार यांचा आगामी निवडणुकीत सहज विजय होणार असल्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com