पुणे

Baramati news : बारामतीत करुणा मुंडेंना रोखणं भाजपच्या हातात होतं पण प्रयत्नच झाले नाही : बड्या नेत्याने सांगितलं 'Inside Connection'

Rohit Pawar on Karuna Munde controversy : बारामतीतील करुणा मुंडे प्रकरणावर मोठा दावा करत भाजपकडे संधी असूनही कारवाई झाली नाही असे बड्या नेत्याने म्हटले आहे. या प्रकरणात ‘इनसाइड कनेक्शन’ असल्याची शक्यता व्यक्त.

Sudesh Mitkar

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांचा सामना अपक्ष उमेदवारांशी होत आहे.

सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीतील नेत्यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील सुरुवातीलाच आपण या निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडी मधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र ही निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केला होता.

असं असलं तरी निवडणूक अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच तब्बल 60 अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल 40 अपक्ष उमेदवारी देखील आपली उमेदवारी मागे घेतल्याचे पाहायला मिळालं. सध्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 22 अपक्ष उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहे. या अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीचे अपेक्षित प्रयत्न करण्यात आले नसल्याचा आरोप सध्या विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

याच बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. रोहित पवार आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यांनी गाव भेट दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्या दरम्यान बोलताना रोहित पवार म्हणाले, खरंतर बारामती पोटनिवडणुकीमध्ये जे 22 ते 23 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. ते राहिला नको होते. अजित पवार यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून जो उमेदवारीचा आकडा 60 होता तो 22 ते 23 वर आणला.

मात्र अपक्ष उमेदवारांची नावे राहिली आहेत. त्यातील एक नाव मी पाहिलं तर ते करुणा मुंडे यांचे आहे. त्यांना भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याने त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवला नसता. याच्या मागचं कारण असं की महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि त्यावेळी आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून अजित पवार यांना विरोधी पक्ष नेता म्हणून निवडलं होतं. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे हे भाजपवर जोरदार टीका करत होते.

ज्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाजपा विरुद्ध बोलत होते. त्याच अधिवेशनात एका भाजपच्या मोठ्या नेत्याने करुणा मुंडे यांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि त्या पत्रकारांशी बोलल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका करणे सोडून दिलं.

त्यामुळे मला वाटतं की भाजपच्या कोणत्याही नेत्याने करुणा मुंडे यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता. मात्र तरी देखील लोक हुशार आहेत. ज्या लोकांनी बाहेरून येऊन या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना एकही मतदान पडणार नाही. आणि जे बारामती मधील उमेदवार आहेत. त्यांचे स्वतःचे मतदान सोडलं तर त्यांच्या कुटुंबातील देखील मतदान त्यांना पडणार नाही. असं रोहित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT