

Amravati Viral Video Case: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. सोशल मीडियावर मैत्री करून विश्वास संपादन करत तरुणींना जाळ्यात ओढण्याचा आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात सुमारे 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर आली असून तब्बल 180 पेक्षा अधिक मुलींचा यात समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्यात अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित 19 वर्षीय मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले की, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींशी ओळख वाढवत असे. त्यानंतर प्रेमाचे आमिष दाखवत त्यांच्याशी जवळीक निर्माण करून खासगी क्षण गुप्तपणे चित्रित करत असे. हे व्हिडिओ आणि फोटो नंतर सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करून संबंधित मुलींना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक पीडित मुली अल्पवयीन असल्याची शक्यता आहे. काही व्हिडिओंमध्ये मुलींची असहायता स्पष्ट दिसून येत असल्यामुळे ब्लॅकमेलिंगद्वारे त्यांचे शोषण झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पीडितांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आरोपी एकटाच नसून त्याच्या मागे मोठे जाळे असण्याची शक्यता तपासात समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतरही एकही पीडित अधिकृत तक्रार घेऊन पुढे आलेली नाही. मात्र पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत तपास सुरू केला आहे. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.