Sunetra Pawar Harshwadhan Sapkal Aakash More .jpg Sarkarnama
पुणे

Baramati bypoll update : मोठी घडामोड : सपकाळांचा थेट काँग्रेस उमेदवाराला फोन; आकाश मोरेंना निरोप पोहोचला

Akash More Congress candidate: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे.

Rajanand More

Baramati election news : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत घडामोडींना आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी नेत्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माघार घेण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर करून टाकले. मात्र, दिल्लीतून यावर अंतिम घोषणा होईल, हेही स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे आता काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकीकडे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मनधरणी करत असतानाच वडेट्टीवार यांनी निर्णय सांगून टाकला. त्यामुळे काँग्रेसमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. सपकाळ यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सपकाळांची भेट घेतली. या भेटीनंतर सपकाळ यांनी थेट आकाश मोरे यांना फोन लावला. सपकाळांनी त्यांना काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्न विचारला. त्यावर आकाश मोरे यांनी पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे उत्तर दिले. त्यामुळे आता सपकाळ यांच्यावरच माघारीचा निर्णय अवलंबून असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर आकाश मोरे यांनी मात्र सपकाळांकडे बोट दाखविले आहे. आकाश मोरे यांनी सांगितले की, मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. पक्ष, सपकाळसाहेब जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही निर्णय़ घेऊ. अजितदादांच्या अपघाताबाबत एफआयआर दाखल केल्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा आमचा मुळ मुद्दा होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सपकाळ यांची भेट घेतली आहे. याबाबत बोलताना आकाश मोरे यांनी सांगितले की, रोहितदादांनी सपकाळ यांना काय सांगितले, त्यानुसार जे काही त्यावर विचार करू. पक्ष जो ठरवेल, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ. सपकाळसाहेबांनी सांगितल्यानंतरच माघार घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघी काही मिनिटे उरली आहेत. अजूनही अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. आकाश मोरे यांनी माघार घेतली तरी करूणा मुंडे माघार घेणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT