Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादांनी बाण सोडला ; निशाण्यावर कोण ? नेमक काय घडलं..

सरकारनामा ब्युरो़

Baramati News : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. एन्व्हायरमेंट फॉर्म ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमास अजित पवार यांनी उपस्थिती लावली.

हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने अजितदादांनी या खेळांच्या विभागाला भेट दिली. यावेळी आयोजकांनी अजित पवार यांना धनुष्यबाण हातात देऊन निशाणा साधण्याची विनंती केली.

राजकारणात विरोधकांवर अचूक निशाणा साधणारे अजितदादांनी काळी क्षण या धनुष्यबाणाकडे पाहिले. आयोजकांनी त्यांना त्यांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. आपल्या तीक्ष्ण नजरेतून अजितदादांनी बाण सोडला अन् उपस्थितांनी टाळ्या वाजून अजितदादांचं कौतुक केलं.

दरम्यान काल (शनिवारी) अजित पवार हे छत्रपती संभाजीनगर येथे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले,"सध्या राज्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. एकविसाव्या शतकातही मुंबईत अशी घटना घडली आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात केंद्राने राज्याने कायद्यात बदल करुन त्या व्यक्तीला तशाच प्रकारे शिक्षा दिली पाहिजे.'

''आपला देश आणि महाराष्ट्र सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे'', असं अजित पवार म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन आज अजित पवार यांनी केलं. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT