Maharashtra government decision : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा झाल्यानंतर मोठी घडामोड समोर आली आहे. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयाला उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर राज्य शासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.
आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्याच्याशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालय या दोन्ही घटकांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचेच नाव कायम राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयास तसेच बारामतीतील आयुर्वेदीक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयास अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.
निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याला विविध सामाजिक संघटनांकडून विरोध झाला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नावच रुग्णालयाला कायम ठेवावे, अशी आक्रमक भूमिका प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी घेतली होती. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या निर्णयामुळे निर्माण झालेली परिस्थिती व विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेला रोष याचा विचार करुन अजितदादा पवार नामकरणाचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे महाविद्यालय व संलग्नित सर्वोपचार रुग्णालय या दोन्ही संस्थांना या पुढील काळात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय शासकीय परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.
वैदयकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही विधानसभेत या बाबतची माहिती दिली. दरम्यान, या निर्णयामुळे निर्माण झालेला वाद आता शमण्याची चिन्हे असून, आगामी विधानसभा पोटनिवडणुकीवर याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.