Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : महायुतीला धक्का; अजितदादांचा अर्ज नामंजूर !

Chaitanya Machale

Baramati Lok Sabha Constituency : केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहा महिन्यांपूर्वी फूट पडली. अजित पवार यांनी महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन बाहेर पडत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर सत्तेतदेखील अजितदादा सहभागी झाले. शिंदे-फडणवीस सरकारने अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासह सुनेत्रा पवार यांनीदेखील लोकसभेसाठी अर्ज भरला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी अर्जांची आज छानणी झाली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजित पवार यांनी भरलेला अर्ज नामंजूर केला. निवडणूक आयोगाकडून अर्जाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अजित पवारांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरण्यात आला होता.

सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्ज भरला होता. त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर सुळे यांचा डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडके यांचाही अर्जदेखील मंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. अर्जाच्या छाननी आज झाली. यासाठी अनेकांना बोलाविण्यात आले होते. त्यावेळी एकाच पक्षाचे दोन अर्ज असल्याने एक जणांचा अर्ज हा मंजूर करण्यात आला. ज्याचा अर्ज पहिला आला आहे. त्याचाच अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजयी अशी लढत होणार हे निश्चित झाले आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. खासदार सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले असून ,सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार खिंड लढवित आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT