Baramati Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पुणे

Bhor News: भोरकरांची नाराजी कोणत्या पवारांना भोवणार? परिसरात लागले पोस्टर; 'नको आता MIDCचे गाजर...'

Baramati Lok Sabha Election 2024:उद्योगधंदे आल्याने शिरवळ, खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी आणि हाताला रोजगार मिळाला आहे. दुसरीकडे भोर परिसरातील तरुणांना रोजगारासाठी मोठा प्रवास करून इतरत्र जावे लागत आहे.

Sudesh Mitkar

Pune News: एकेकाळी भोर परिसरामध्ये मोठ मोठे उद्योगधंदे (Bhor MIDC Issue) नावारूपाला आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाले होते. मात्र, नंतरच्या काळामध्ये हे कारखाने बंद पडल्याने या परिसरामध्ये रोजगाराच्या अत्यंत कमी संधी उपलब्ध असल्याने बहुतांश तरुण हे पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

आता हाच धागा पकडून भोर परिसरातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. भोरच्या (Bhor)विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आलेले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून एक प्रकारे दोन्ही पवारांना इशारा देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये भोरमध्ये एमआयडीसी आणण्याचे आश्वासन नेतेमंडळी देताना दिसतात, मग ती निवडणूक विधानसभेच्या असो लोकसभेचे असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो नेते मंडळी येतात एमआयडीसीचे आश्वासन देतात मोठ मोठी भाषण देतात. मात्र, त्यानंतर काहीच होताना दिसत नाही.

एकीकडे भोरच्या जवळ असलेल्या शिरवळ आणि खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत असून, खूप जास्त रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे बहुतांश तरुण हे भोर परिसरातून या भागामध्ये रोजगारासाठी जात आहेत. उद्योगधंदे आल्याने शिरवळ, खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी आणि हाताला रोजगार मिळाला आहे. दुसरीकडे भोर परिसरातील तरुणांना रोजगारासाठी मोठा प्रवास करून इतरत्र जावे लागत आहे. भोर परिसरात एमआयडीसी व्हावी, अशी मागणी अनेक दशकांपासून करण्यात येत आहे, असे असताना शेजारील खंडाळा शिरवळ परिसरात एमआयडीसी मंजूर झाली. मात्र, भोर अद्याप एमआयडीसीपासून वंचित असल्याने नागरिकांचा प्रचंड रोष आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा (Baramati Lok Sabha Election 2024) विचार केल्यास बारामती परिसरात एमआयडीसी आहे. पुरंदरलादेखील जेजुरी परिसरात एमआयडीसी आहे. मात्र, भोरला आणि राजगड तालुक्याला एमआयडीसी अद्याप मंजूर झालेली नसल्यामुळे तरुणांमध्ये नेते मंडळींबाबत फार रोष आहे. हाच रोष कुठेतरी पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

भोरमधील चौपाटी परिसरामध्ये "नको आता एमआयडीसीचे गाजर करू या आता बदलाचा जागर" असं आशयाचे पोस्टर झळकले आहेत. बेरोजगारीमुळे भोर सोडलेले भोरकर असा मजकूर या पोस्टरखाली लिहिला आहे. भोरकरांमध्ये असलेल्या एमआयडीसीबाबतच्या नाराजीचा फटका नेमका कोणाला बसणार हे सांगणे कठीण आहे. कारण एमआयडीसी भोरमध्ये न येण्यास पवार कुटुंबीय कुठेतरी जबाबदार आहेत, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे रोष व्यक्त करायचा तर नेमका कोणत्या पवारांवर हा प्रश्न मतदारांसमोर राहणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT