Dattatraya Bharne Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

Dattatray Bharne and Harshvardhan Patil : बारामती लोकसभेच्या निकालामुळे दत्तात्रय भरणे अन् हर्षवर्धन पाटलांचं टेन्शन वाढणार?

Indapur Vidhansabha Constituency : इंदापूर तालुक्याच्या राजकारण मागील 15 वर्षांपासुन इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याभोवतीच फिरत आहे.

राजकुमार थोरात - Sarkarnama

Baramati Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार अशी प्रथमच लढत पाहायला मिळाली. या लढती केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचंही लक्ष होतं. कारण, सत्ताधारी महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

अखेर या हायहोल्टेज लढतीत सुप्रिया सुळे दीड लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाल्या. खरंतर अजित पवारांनी या निवडणुकीसाठी पूर्णपणे ताकद लावल होती, मात्र त्यांना अपयश आलं.

आता या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालामुळे इंदापूर विधानसभेच्या निवडणूकीचे गणिते बदलणार आहेत. आमदार दत्तात्रेय भरणे(Dattatray Bharne) व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे टेन्शन वाढणार असून आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

इंदापूर तालुक्याच्या राजकारण मागील 15 वर्षांपासुन इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) यांच्याभोवतीच फिरत आहे. 2009 मध्ये दत्तात्रेय भरणे यांनी बंडखोरी करुन विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधामध्ये लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये भरणे यांचा पराभव झाला. कारण, 2009 च्या विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भरणे यांच्या सोबत नव्हती. शरद पवारांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी सांगता सभा घेतली होती.

शरद पवारांच्या एका सभेमुळे तालुक्यातील वातावरण फिरल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा विजय झाला असल्याचे आजही बोलले जाते. 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन निवडणूक लढवून सलग दोन वेळा जिंकली. त्यावेळी संपूर्ण राष्ट्रवादी भरणे यांच्या सोबत होती आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीचे पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रेय भरणे यांच्यासाठी सांगता सभा घेतल्यामुळे भरणे यांचा विजय झाला असल्याचे जाणकार सांगतात.

महाविकास आघाडीच्या दत्तात्रेय भरणे यांना सहा खात्याचे राज्यमंत्रीही पक्षाने केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर इंदापूर तालुक्यातही दोन गट पडले आहेत. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपची युती होती. इंदापूर व मोहाळेचे आमदार, एक माजी मंत्री, एक जिल्हा परिषदेचा माजी सभापती, एक जिल्हाध्यक्षसह सात जिल्हा परिषद सदस्य , 13 पंचायत समिती सदस्य,17 नगरसेवक, तालुक्यातील गावातील सरपंच, उपसरपंच अजित पवार गटाकडे असूनही खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातुन 25951 मतांचे मताधिक्य मिळाले.

शरद पवारांना(Sharad Pawar) इंदापूर तालुक्यामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच शेतकरी वर्गही त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे लोकसभेच्या निकालावरुन दिसले. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व निवडणूका लढविणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेच माजी सभापती प्रवीण माने हे 2019मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. 2024ची विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असणार असून निवडणूक चुरशीची होणार आहे. आमदार दत्तात्रेय भरणे व हर्षवर्धन पाटील यांचे टेन्शन वाढणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT