NCP Sharad Pawar : लोकसभा निकालाचा इम्पॅक्ट! अजित पवार गटातून 'आउटगोईंग' शरद पवार गटात 'इन्कमिंग'

NCP Ajit Pawar Vinayak Ranasumbhe : पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिलेले आमदार रोहित पवार यांच्या अभिनंदनासाठी मोठी रीघ लागली आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 News : लोकसभा निकालाचा इम्पॅक्ट म्हणून भाजपमधून पहिला राजीनामा बुधवारी (ता.5) आला. अमरावतीतील त्यांच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने अमरावती भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर भाजपच नाही, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुतीतील इतर दोन पक्षांतही असे काही राजीनामे येण्याची आणि संघटना पातळीवर खांदेपालट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आघाडीत इनकमिंग आणि घरवापसी सुरु झाली आहे. त्यात पहिली घरवापसी पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार राष्ट्रवादीत बुधवारी (ता.5) झाली.

राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा शहर प्रवक्ते आणि माजी नगरसेवक विनायक रणसुंभे हे राष्ट्रवादीमध्ये (शरद पवार गट) परत आले. शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे ते समर्थक आहेत. पानसरेंची यापूर्वीच घरवापसी झाली आहे.

या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान बदलाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी पुन्हा परत फिरलो,अशी प्रतिक्रिया रणसुंभेंनी आपल्या घरवापसीवर 'सरकारनामा'ला दिली. तसेच आमच्या मतदारसंघातून (शिरुर) शरद पवार Sharad Pawar गटाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे निवडून आल्यामुळे परत आलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिलेले आमदार रोहित पवार यांच्या अभिनंदनासाठी मोठी रीघ लागली आहे. त्यात अजित पवार गटातील मंडळी देखील आहेत.

रणसुंभेंनीही या दोघांची बुधवारी (ता.5) प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी पुन्हा घरवापसी केली. त्यांनी कोल्हेंचे या निवडणुकीत उघड काम केले. तेथेच त्यांच्या घरवापसीचे संकेत मिळाले होते.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर ठरले 'बाजीगर!'; बुलढाण्यात नेमकं काय झालं ?

भोसरी विधानसभा मतदारसंघात जरी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना 9 हजाराचे लीड मिळाले असले तरी रणसुंभे राहत असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या चिखली भागात कोल्हेंना २२२ मतांचे लीड मिळाले.

रणसुंभेचे परत येणे हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी तो बाकी है! असे शरद पवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले. काही माजी नगरसेवकांसह अनेकजण संपर्कात असून त्यातील कुणाला प्रवेश द्यायचा हे पक्ष ठरवेल,असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरी घरवापसी तथा पक्षप्रवेश आठ दिवसांत होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

(Edited By Roshan More)

Sharad Pawar, Ajit Pawar
Beed Lok Sabha Result 2024 : ‘उघडा डोळे, बघा नीट’; बीडच्या निकालाने मुंडे भावंडांना मेसेज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com