Supriya Sule Latest News Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : 'भ्रष्टाचाराचा आरोप झाला एक जण भाजपत गेला', सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल

Roshan More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal तुरुंगात आहेत. यावरून सुप्रिया सुळे यांनी आपल्या कन्हेरीच्या प्रचार सभेत भाजपवर जोरदार हल्ला केला.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, निर्मला सीतारामण यांनी संसदेत अशोक चव्हाण, अरविंद केजरीवाल यांच्यावर पैसे खाल्ल्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण एक जण भाजपमध्ये गेला तर एक जण तुरुंगात गेला. आम्हाला अशोक चव्हाण हे निर्दोष आहेत असेच वाटत होते. मात्र, आता ते निर्दोष होते की नाही हेच कळेना. अशोक चव्हाण ( Ashok Chavan) माझ्यावर नाराज आहेत. ते म्हणतात सुप्रिया सुळे माझा उल्लेख करतात. पण आम्ही ते निर्दोष आहे असे सांगत होतो. तर, त्यांच्यावर ज्या निर्मला सीतारमण यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला ते त्यांच्या पक्षात गेले, असा टोला सुळे यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एक जण विचारत होता बारामती लोकसभा मतदारसंघातील पवारसाहेबांनी आणलेली कंपनी राहते की जाते. नवीनवाले काय करतात काय माहीत. पण मी तुम्हाला शब्द देते बारामती मतदारसंघात पवारसाहेबांनी 99 टक्के कंपन्या आणल्या त्या चालवल्या आहेत. त्यातली एकही नोकरी आम्ही बाहेर राज्यात जाऊ देणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाला.

'माझी लढाई ही कोणाच्या विरोधात नाही. ती चुकीच्या विचारधारे विरोधात आहेत. माझं चिन्ह बदललं आहे. पक्ष बदलला म्हणून माझं चिन्ह बदललेलं नाही. चिन्ह का बदललं हे आपल्याला सगळं माहीत आहे. मी इतिहासात रमत नाही. आपल्याला जे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह मिळाले आहे. ते कधी वापरतात हे तुम्हाला माहिती आहे. शुभ कार्यात तुतारी वाजवतात. शिवाजी महाराजांनी युद्धाच्या आधीदेखील तुतारी वाजवली होती. वेळ कमी आहे आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहाेचवा', असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT