Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता. १८) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी संपत्तीबाबत शपथपत्र जोडले आहे. यामध्ये त्यांच्यावर असलेल्या कर्ज आणि उपन्नाची माहिती दिली आहे. सुळेंनी प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून एकूण 55 लाख हातउसने कर्ज घेतले आहे. ही माहिती शपथपत्रातून समोर आली आहे.
सुळेंनी दाखल केलेल्या अर्जासोबत संपत्तीबाबत शपथपत्र दिले आहे. यात त्यांच्याकडे रोख रक्कम 42 हजार 500 आहे. तर एकूण प्रॉपर्टी ही 38 कोटी सहा लाख 48 हजार 431 रुपये आहे. तर पती सदानंद सुळे यांच्याकडे 114 कोटी 63 लाख 80 हजार 575 एवढी प्रॉपर्टी आहे. सुळेंकडे 1927.660 ग्रॅम म्हणजेच एक कोटी एक लाख 16 हजार 118 रुपयांचे सोने आहे. तर 6742.100 ग्रॅम म्हणजेच चार लाख 53 हजार 446 रुपये किंमतीची चांदी आणि एक कोटी 56 लाख 6 हजार 321 रुपयांचे हिरे आहेत. यात सुळे यांनी त्यांचा व्यवसाय हा शेती सांगितले आहे.
2022-2023 मध्ये आयकर विवरणपत्रामध्ये दर्शवण्यात आलेले एकूण उत्पन्न
सुप्रिया सुळे - 1 कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये
सदानंद सुळे - 3 कोटी 90 लाख 02 हजार 220
रोख रक्कम
सुप्रिया सुळे - 42 हजार 500
सदानंद सुळे - 56 हजार 200
बँक खात्यातील ठेवी -
सुप्रिया सुळे - 11 कोटी 83 लाख 29 हजार 195
सदानंद सुळे - 2 कोटी 57 लाख 74 हजार 150
शेअर्समधील गुंतवणूक -
सुप्रिया सुळे - 16 कोटी 44 लाख 24 हजार 140
सदानंद सुळे - 33 कोटी 57 लाख 58 हजार 962
राष्ट्रीय बचत योजना -
सुप्रिया सुळे - 7 लाख 13 हजार 500
सदानंद सुळे - 16 लाख 34 हजार 30
कर्ज म्हणून देण्यात आलेली रक्कम -
सुप्रिया सुळे - 3 कोटी 50 लाख 86 हजार 080
सदानंद सुळे - 60 कोटी 8 लाख 71 हजार 253
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे कोणतेही वाहन, जहाज, मोटार नाही
सोनं -
सुप्रिया सुळे - 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचं सोनं
सदानंद सुळे - 1 कोटी 13 लाख 81 हजार 855 रुपयांचं सोनं
चांदी -
सुप्रिया सुळे - 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदी
सदानंद सुळे - 17 लाख 62 हजार 72 रुपयांची चांदी
हिऱ्याच्या मौल्यवान वस्तू -
सुप्रिया सुळे - एक कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये
सदानंद सुळे - एक कोटी 62 लाख 74 हजार 253 रुपये
एकूण स्थूल मूल्य -
सुप्रिया सुळे - 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये
सदानंद सुळे - एक अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये
शेतजमीन बाजरमूल्य
सुप्रिया सुळे - 5 कोटी 45 लाख 24 हजार 336 रुपये
बिगर शेती जमिन बाजारमूल्य
सुप्रिया सुळे - 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये
सदानंद सुळे - 4 कोटी 66 लाख 26 हजार 094 रुपये
सुप्रिया सुळे यांच्यावर कर्ज -
पार्थ पवार - 20 लाख रुपये
सुनेत्रा पवार 35 लाख रुपये
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जंगम मालमत्ता (एकूण मूल्य)
सुप्रिया सुळे - 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये
सदानंद सुळे - 1 अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये
स्थावर मालमत्ता -
सुप्रिया सुळे - 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये
सदानंद सुळे - 4 कोटी 66 लाख 26 हजार 94 रुपये
वारसाप्राप्त मालमत्ता -
सुप्रिया सुळे - 7 कोटी 19 लाख 84 हजार 336 रुपये.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.