Sunetra Pawar Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनावर वादग्रस्त विधान : राष्ट्रवादी काँग्रेसमधून लाडक्या नगरसेवकाची हकालपट्टी

NCP Politics: बारामती नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजित पवार यांच्या निधनावर वादग्रस्त विधान केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

Deepak Kulkarni

Baramati News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातून अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामती सावरलेली नाही. पण आता याच बारामतीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्याचं नाव अजितदादांच्या लाडक्या नगरसेवकांच्या यादीत होतं, अशाच एका बारामतीतील नगरसेवकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

बारामती नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजित पवार यांच्या निधनावर वादग्रस्त विधान केलं होतं. यासंबंधित एक ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवण्यात येत होती. आता मासाळ यांच्या राष्ट्रवादीकडून थेट विधानानंतर पक्षाने मासाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. किशोर मासाळ हे अजित पवार यांच्या लाडका नगरसेवक होता. ते नेहमी मासाळचं तोंडभरुन कौतुक करायचे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्र्वादीतून अखेर मासाळची हकालपट्टी करण्यात आली आहे. यावेळी तटकरे यांनी किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याची दखल पक्षाने घेतली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे असंही तटकरे यांनी म्हटलं आहे.

किशोर मासाळने अजितदादांविषयीची ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर मासाळने माफी मागितली होती. यावेळी त्याने ‘चार दिवसांपूर्वी माझी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात मी अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याची कबुली दिली होती.

तसेच या चुकीच्या वक्तव्यावरुन मी अजित पवारांचे कुटुंबिय आणि समस्त बारामतीकरांची माफी मागतो. मी जे बोललो त्याचा पश्चाताप म्हणून अजित पवारांचा अपघात झाला, त्या ठिकाणी एकदिवसाचं अन्न त्याग आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचंही किशोर मासाळ यानं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT