BJP Crisis : भाजपने प्रदेशाध्यक्ष नियुक्ती करत भाकरी फिरवताच प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; पक्षात मोठी खळबळ

Punjab BJP Faces Internal Political Crisis Over Vice President Resigns Controversy : पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पार्टीने मोठा निर्णय घेत भाकरी फिरवली होती. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी केवल सिंग ढिल्लों यांची नियुक्ती केली.
pm narendra modi amit shah
pm narendra modi amit shahsarkarnama
Published on
Updated on

Punjab BJP News : भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका, राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देत अत्यंत मोठा निर्णय घेतला. 28 मे रोजी पक्षाने एकाच वेळी चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. ज्यात दिल्ली, हरियाणा, त्रिपुरा आणि पंजाबमध्ये भाकरी फिरवण्यात आली होती. पक्षाने पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्षपदी केवल सिंग ढिल्लों यांची नियुक्ती केली होती. आता हीच नियुक्ती वादाचे कारण ठरले असून पंजाब भाजपचे उपाध्यक्ष डॉ. जगमोहन सिंह राजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या अचानक पडलेल्या राजीनाम्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

भारतीय जनता पक्षाने 28 मे एक अत्यंत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. याबाबत राष्ट्रीय सरचिटणीस यांनी जारी केलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली होती. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची सांगितले होते. तसेच पंजाब भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा केवल सिंह ढिल्लों यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगत हा निर्णय तातडीने लागू करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

यानंतर आता पंजाबमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला असून नाराजी उघड होताना दिसत आहे. या निर्णयावर आधीच माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाला धारेवर धरले होते. त्यांनी, ढिल्लों यांच्या नियुक्तीपूर्वी त्यांचा सल्ला घेतला गेला नाही, असे म्हणत पक्षाला सुनावले होते.

pm narendra modi amit shah
BJP Crisis : 'MLC' बिनविरोध होताच पक्षांतर्गत संघर्ष उफाळला, शहराध्यक्षासह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा; भाजपला सर्वात मोठा धक्का

यानंतर आता येथे माजी आयएस अधिकारी आणि भाजप नेते डॉ. जगमोहन सिंह राजू यांच्या नाराजीचा उद्रेक झाला आहे. राजू यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून भाजपचे महासचिव मंत्री श्री निवासुलू यांना 5 जून रोजी पत्र लिहले.

या पत्रात त्यांनी, पक्षाने आपल्याला कोणतीही जबाबदारी देऊ नये असे म्हटले आहे. तसेच, आपण गेल्या चार वर्षात उपाध्यक्ष आणि महासचिव म्हणून काम केले असून आता राज्यातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष घालायचे आहे, असे म्हटले आहे.

pm narendra modi amit shah
BJP Crisis : भाजपला धक्का! कोकणात राजकीय भूकंप; हाकालपट्टी केलेल्या बड्या नेत्याने केला असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

एकीकडे त्यांच्या या राजीनाम्याने पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली असून दुसरीकडे भाजपने केलेली प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून ते नाराज असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी राजू यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आणि ढिल्लों यांच्याकडे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com