Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी सुरु असलेल्या तपासाला गती मिळायला हवी अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी या बाबतची मागणी केली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवानेते पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, डीजीसीए यांच्याकडून संबंधित विमान कंपनीवर कारवाई सुरु आहे, जय पवार यांनीही या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर हा खरच अपघात होता की घातपात होता याची सखोल चौकशी व्हावी अशी राष्ट्रवादीचीही भूमिका असून त्या बाबत मुख्यमंत्री व केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे या पत्रकार परिषदेत नमूद केले गेले.
या तपासामध्ये ज्या बाबी निष्पन्न होतील, त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर सक्षम प्राधिकरणाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात अनेक उलटसुलट बातम्या येत आहेत, मात्र तरिही अधिकृतपणे ब्लॅकबॉक्स सुरक्षित आहे अशी माहिती मिळालेली असून त्या नुसार पुढील कारवाई व्हावी असे नमूद केले गेले.
सुनेत्रा पवार यांनी यात केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केलेली आहे, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. या प्रक्रीयेला गती मिळावी अशी पक्षाची मागणी असल्याचे नमूद केले गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.