

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी महायुतीच्या प्रयोगाची गरज नसल्याची भूमिका घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे एकहाती सत्ता स्थापन करण्याची मागणी केली आहे. याबाबत स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर ही भूमिका स्पष्टपणे मांडल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सूत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी इच्छुक नेत्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. स्थायी समिती, इतर विविध समित्यांवरही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहावे, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी २० मार्चपूर्वी करण्याचे आदेश आले असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापली 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात आणि बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांची नावे चर्चेत आहेत.
यंदा दौंड तालुक्यालाच पुन्हा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, मात्र अध्यक्षाचा कार्यकाल किती ठेवायचा यावरही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने मित्र पक्षांना सामावून घेण्याची मानसिकता स्थानिक नेत्यांमध्ये सध्या तरी दिसत नाही.
येत्या काळात पुणे जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता प्रस्थापित करण्याची जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात असून, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ग्रामीण पकडीला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान, याबाबत आता काय निर्णय घेतला जाणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.