Malegaon Sugar Factory
Malegaon Sugar Factory  Sarkarnama
पुणे

Malegaon Sugar Factory : बारामतीत राजकीय घडामोडींना वेग ; 'माळेगाव'चे अध्यक्ष तावरेंचा राजीनामा, अजितदादांच्या निर्णयाकडे लक्ष

Mangesh Mahale

-कल्याण पाचंगणे

Malegaon : बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कारखान्याच्या राजकारणात येत्या काळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे माळेगाव कारखान्याचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निर्णयावर ठरणार आहे.

तावरे, जाधव यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दुजोरा दिला. तावरे,जाधव यांचे राजीनामे पक्षाकडे आले असून कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती होळकर यांनी दिली.

तावरेंनी कारखान्याच्या अध्यक्षपदी साडेतीन वर्ष काम पाहिले, तर जाधवांनी उपाध्यक्षपदावर एक वर्षे काम केले आहे. एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा देत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवणे आणि सभासदांना सर्वाधिक पैसे देणे, ही बाब केंद्रस्थानी ठेवून मी संचालकांच्या मदतीने काम केले. वयोमानानुसार माझी तब्बेत साथ देत नाही.  मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची भावना तावरे यांनी व्यक्त केली आहे. `

"शरद पवार,अजितदादांनी मला माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून सभासदांची सुमारे अठरा सेवा करण्याची संधी दिली. हे मी विसरु शकत नाही, त्यांच्यासह आजी-माजी संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे माळेगाव कारखाना राज्यात अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न केला. गतवर्षीच्या उसाला ३,४११ रुपये प्रतिटन दर जाहीर करून राज्यात ऊस दराच्या बाबतीत आघाडी घेतली," असे तावरे म्हणाले.

अध्यक्षपदासाठी 'या' नावाची चर्चा..

तावरे, जाधव यांच्या राजीनाम्यानंतर आता कारखान्याचे संचालक मंडळामध्ये अध्यक्षपदासाठी अॅड. केशवराव जगताप, योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, सुरेश खलाटे हे संचालक इच्छुक आहेत. अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे माळेगाव कारखान्याचे सर्वेसर्वा अजित पवार यांची निर्णयावर ठरणार आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT