Thane : समाज प्रबोधन करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच धर्तीवर कृष्णजन्म आणि गोपाळकाला साजरा होऊ लागला. काही वर्षांपासून गणेशोत्सव आणि दहीहंडी राजकीय नेत्यांसाठी महत्वाचे उत्सव ठरत आहेत. या दोन्ही उत्सवावर नेत्यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. यंदाच्या दहीहंडीत 'प्रचारा'चे थर रचण्याचे 'नियोजन'नेत्यांनी केले आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात कुणाची दहीहंडी वरचढ ठरणार यासाठी चुरस लागली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही उत्सवासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयार केली आहे. महापालिका निवडणुकांमुळे आयोजकांकडून गोविदांना लाखोंचे बक्षीस मिळणार आहे.
यंदा प्रथमच दहीहंडीचे थेट प्रक्षेपण ४० लोकलमधून होणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते, माजी महापौर नरेश म्हस्केंनी सांगितले. 'दहीहंडी'चे कोट्यवधीचे 'लोणी' गोविंदांना देण्याचे पक्षांनी जाहीर केले आहे. ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात चुरस लागली आहे.
दोन्ही गटांच्या गोविंदांची रंगीत तालीम सुरु आहे. ठाण्यातील दहीहंडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यातील दहीहंडीवर शिंदे गटाचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा उत्सव साजरा होत आहे.
राजन विचारेंचे जांभळी नाक्यावरून आव्हान..
ठाण्यात आनंद दिघे यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावर सुरू केलेली दहीहंडी मानाची हंडी मानली जाते. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्केंनी टेंभी नाक्यावरील या उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. दिघेंच्या या मानाच्या दहीहंडीला जांभळी नाक्यावरून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आव्हान दिले आहे.
शिवसेना भवनासमोर 'निष्ठावंतांची'दहीहंडी
शिवसेना भवनासमोर 'निष्ठावंतांची'दहीहंडी होत आहे. मनसेची भगवती शाळेच्या मैदानात आणि आमदार प्रताप सरनाईक यांची वर्तकनगर झेडपी मैदानात दहीहंडीचा थरार रंगणार आहे. सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानवतीने ‘प्रो-गोविंदा’च्या संकल्पनेतून ही दहीहंडी आयोजित केली आहे. भाजपचे शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानची डॉ. घाणेकर नाट्यगृह चौकात तर कृष्णा पाटील यांची गोकुळ दहीहंडी कॅसलमील चौकात असणार आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.