Sharad Pawar PM Narendra Modi  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : पीएम नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द; शरद पवार यांच्या हस्ते होणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन!

PM Narendra Modi Baramati visit News : पीएम मोदींचा बारामती दौरा सुरुवातीला 3 नोव्हेंबर आणि त्यानंतर 16 नोव्हेंबर या तारखा चर्चेत होत्या, मात्र प्रशासकीय कारणांमुळे हा दौरा लांबणीवर पडला होता.

सरकारनामा ब्युरो

Pune News : बारामती येथील प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. त्यासाठी सुरुवातीला 3 नोव्हेंबर आणि त्यानंतर 16 नोव्हेंबर या तारखा चर्चेत होत्या. मात्र, पीएम मोदी यांचा बारामती दौरा तुर्तास रद्द झाला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. आता स्वतः शरद पवार हे 12 डिसेंबर रोजी प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.

विद्या प्रतिष्ठान संकुलातील नव्या 'प्रेरणास्थळ' वास्तूच्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले होते. सुरुवातीला 3 नोव्हेंबर आणि त्यानंतर 16 नोव्हेंबर या तारखा चर्चेत होत्या, मात्र प्रशासकीय व प्रकृतीच्या कारणांमुळे हा दौरा लांबणीवर पडला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र, पीएम मोदी यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला असल्याचे समजते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मोदी आणि पवार एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते .

दरम्यान, पीएम मोदी (Narendra Modi) यांच्या बारामती दौऱ्याची तारीख ठरवण्यासाठी शुक्रवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संकुलात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर पीएम मोदी यांचा बारामती दौरा तुर्तास रद्द झाला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. आता स्वतः शरद पवार हे 12 डिसेंबर रोजी प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT