बारामती : बारामती (Baramati) येथील एका वरिष्ठ पोलिस (Police) अधिकाऱ्याने एका महिलेला तिच्या व्हॉटस ॲपवर अश्लील मेसेज (message) पाठविल्यानंतर आता वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने संबंधित महिलेला तिच्या व्हॉटस ॲपवर अश्लील मेसेज टाकून तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत. या बाबत आता वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Baramati senior police officer's obscene message to woman)
या पूर्वीही बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी केली होती. त्या वेळी ते प्रकरण पार विधानसभेपर्यंत गाजले होते. त्या वेळीही वरिष्ठांनी शेवटच्या क्षणापर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली होती.
आता पुन्हा एकदा त्याच दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हे मेसेज पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत. या बाबत पोलिसांना अजून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केलेली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.
या घटनेची कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी संबंधित महिलेला या पोलिस अधिकाऱ्याने काही अश्लील इमोजीही पाठवलेले असून तिला आय लव्ह यू तसेच तुझा होकार आहे की नाही, ते एकदाच सांग. शेवटचं विचारतोय, असंही या मेसेजमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर हे मेसेज केले गेले आहेत.
पोलिसांच्या प्रतिमेबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात पोलिसांच्या वर्तणूकीबद्दल काही सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिस खात्याच्या प्रतिमेशी ही बाब संबंधित असून आता वरिष्ठ बारामतीतील या पोलिस अधिकाऱ्याविरुध्द नेमकी काय कारवाई करतात या कडे सर्वांचेच लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.