Andheri East By-Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान; तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
Uddhav Thackeray-Sharad Pawar
Uddhav Thackeray-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा पोटनिवडणुकीच्या (by-election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) मोठा निर्णय घेतला आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. (NCP supports Shiv Sena for Andheri East by-election)

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. लटके यांच्या निधनामुळे जाहीर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

Uddhav Thackeray-Sharad Pawar
फडणवीसांसोबत बसून खडसेंना काय मिटवायचं होतं : महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण

या पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत. तसेच, दसरा मेळाव्याबाबत ते म्हणाले की, हा शिवसेनेचा मेळावा आहे. तो वेगळा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यात काही करणार नाही. राज्यात दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे, ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत, पण त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनीही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील, त्याने कटुता वाढणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे.

Uddhav Thackeray-Sharad Pawar
तीन तास बसवून ठेवूनही अमित शहांनी खडसेंना भेट दिली नाही : गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून सरकार बनविण्याबाबतचा प्रस्ताव आला होता. त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असे विधान केले होते. त्यावर पवार म्हणाले की, शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव २०१४ मध्ये आला असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण यांनी सांगितलं असलं तरी त्याबाबत मला तरी माहिती नाही.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? यावर पवार म्हणाले की, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही. निर्णय राज्य सरकारने घ्यावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com